लग्नाचे आमिष दाखवून शरिरसंबंध जोडले, पोलिसांनी केली अटक
By Admin | Updated: September 22, 2016 20:25 IST2016-09-22T20:25:45+5:302016-09-22T20:25:45+5:30
लग्नाचे आमिष दाखवून समवयीन तरुणीशी शरिरसबंध जोडणा-या एका आरोपीवर जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

लग्नाचे आमिष दाखवून शरिरसंबंध जोडले, पोलिसांनी केली अटक
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ : लग्नाचे आमिष दाखवून समवयीन तरुणीशी शरिरसबंध जोडणा-या एका आरोपीवर जरीपटका पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमिताभ वाघमारे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील रमाईनगरात राहतो.
वाघमारे एका खासगी कंपनीत रोखपाल आहे. तर, तक्रारदार तरुणी (वय २९) पारिचारिका आहे. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांची ओळख झाली. नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांनी लग्नाचा निर्णय घेऊन ३१ डिसेंबरला पहिल्यांदा शरिरसंबंध जोडले. तेव्हापासून १२ मे २०१६ पर्यंत त्यांच्यात अनेकदा शरिरसंबंध प्रस्थपित झाले.
अलिकडे तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असता तो तिला टाळू लागला. तिने त्याला दोन दिवसांपूर्वी जाब विचारला असता त्याने लग्नास नकार दिला. मनधरणी करून आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचा ईशारा देऊनही तो लग्न करण्यास तयार नसल्याचे पाहून जरीपटका पोलिसांकडे तरुणीने बुधवारी तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी वाघमारेविरूध्द बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक हणवते यांनी आरोपी वाघमारेला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.