शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांप्रमाणेच नवनीत राणांचेही तिकीट कापणार? अनिल बोंडेंचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 11:05 IST

Anil Bonde on Navneet Rana: खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे.

बोगस जातप्रमाणपत्रावरून सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर महाराज यांना यावेळी लोकसभेचे तिकीट देण्यात आले नाही. भाजपाने त्यांचे तिकीट कापून बीडच्या राम सातपुते यांना दिले आहे. असाच नियम भाजपाअमरावतीमध्ये नवनीत राणांना लावणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. यावर भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

खासदार नवनीत राणा यांच्याकडेही जातीचे बोगस प्रमाणपत्र आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. येत्या १ एप्रिलला यावर निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत कौर राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल राणांविरोधात आला तर भाजपा लोकसभा उमेदवारी देणार नसल्याची शक्यता आहे. 

सोलापूरप्रमाणे अमरावतीतही भाजपा राणांना डच्चू देणार असल्याची चर्चा आहे. राणा भाजपाच्या तिकीटावरून लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपानेही अमरावतीची जागा भाजपाच्याच तिकीटावर लढविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप खासदार अनिल बोंडेंच्या वक्तव्याने नवनीत राणांची धाकधूक वाढली असून, राणा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नवनीत राणा यांचे नाव भाजप उमेदवाराच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेले नाही. अमरावती जिल्ह्यात भाजप इतकी मोठी आहे की सर्व नेते पात्र आहेत. सगळेच उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची याचा विचार केंद्रीय निवडणूक समिती करते. नवनीत राणा यांचे नाव भाजप उमेदवारांच्या यादीत असल्याचे कोणीच जाहीर केलेले नाही. अमरावती लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा राहील आणि भारतीय जनता पक्षाचा राहील ही एकच गोष्ट आतापर्यंत जाहीर झाली आहे, असा दावा बोंडे यांनी केला आहे. 

 

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाAnil Bondeअनिल बोंडेBJPभाजपाamravati-pcअमरावतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४