शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 05:34 IST

या निर्णयानुसार आता क गटाच्या परीक्षांसाठी किमान पसेंटाइल अर्हतामान लागू होणार आहे. पर्सेटाइल प्रणाली उमेद्वाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठीही किमान पसेंटाइल अर्हतामान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय यापुढे घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांना लागू होणार असल्याचे 'एमपीएससी'ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

एमपीएससीच्या कार्य नियमावलीतील नियम क्रमांक ८ (vi) मध्ये १३ जानेवारी २०२१ रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियांकरिता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांसाठीदेखील किमान पर्सटाइल अर्हतामान लागू होईल. 

या निर्णयानुसार आता क गटाच्या परीक्षांसाठी किमान पसेंटाइल अर्हतामान लागू होणार आहे. पर्सेटाइल प्रणाली उमेद्वाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते आणि त्या उमेदवाराने किती टक्के उमेदवारांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, हे दर्शवते. एमपीएससी परीक्षेत प्राथमिक व मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्सेटाइल वापरले जाते.

पसेंटाइल म्हणजे काय?

पर्सेटाइल म्हणजे ० ते १०० पर्यंतची एखाद्या विशिष्ट मूल्याच्या खाली असणाऱ्या संख्यात्मक मूल्यांची टक्केवारी. सोप्या भाषेत सांगायचे तर, पर्सेटाइल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचा स्कोअर किती जणांपेक्षा जास्त आहे, हे दाखवणारी टक्केवारी. उदाहरणार्थ समजा एखाद्या परीक्षेत १०० विद्यार्थी बसले आणि तुम्हाला २० पसेंटाइल आहेत, तर याचा अर्थ असा की, तुमच्यापेक्षा कमी गुण ९० विद्यार्थ्यांना मिळाले आहेत.

परीक्षार्थ्यांना 'केवायसी' बंधनकारक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत कोणताही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. उमेदवारांना आधार ऑनलाइन ई-केवायसी, आधार ऑफलाइन पेपरलेस डिजिटल केवायसी, आधार ऑफलाइन पेपर आधारित केवायसी, नॉन-आधार ऑफलाइन केवायसी या चार पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने ओळख पडताळणी (केवायसी) करावी लागेल.

एकदाच नोंदणी करताना उमेदवाराने मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी नोंदवणेही आवश्यक आहे. उमेदवाराने आधार आधारित पडताळणी निवडली, तर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. यामुळे उमेदवारांची ओळख अचूक होईल, फसवणूक व चुकीच्या माहितीला आळा बसेल. भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा यांच्या विविध टप्प्यांवर आधार प्रमाणीकरण वापरता येईल.

सरळसेवा भरतीच्या अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. एमपीएससीने सरळसेवा भरती परीक्षेला पसेंटाइल गुणांकन पद्धत लागू केली आहे, याचा अर्थ या परीक्षांवर एमपीएससीची देखरेख असेल. त्यामुळे या परीक्षांमध्ये गैरप्रकार टळतील, अशी आम्हाला आशा आहे. -महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाexamपरीक्षाStudentविद्यार्थीjobनोकरी