शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वीरपत्नींना आजीवन मोफत एसटी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:29 IST

एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत.

मुंबई  - एसटी महामंडळाच्या ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत’ आतापर्यंत राज्यातील ६३९ शहिदांच्या पत्नींना आजीवन मोफत एसटी पास देण्यात आले आहेत. तसेच कारगील युद्धात शहीद झालेले सुधारक भट यांचा मुलगा इंद्रजीत याला महामंडळात नोकरी देण्यात आल्याची माहिती मंगळवारी एसटी महामंडळाकडून दिली. सुधारक भट यांना वीरमरण आले, त्या वेळी त्यांचा मुलगा इंद्रजीत दोन वर्षांचा होता. तो वसई येथे वास्तव्यास असून आता त्याचे बी.ई.पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. सध्या तो आगारप्रभारक पदासाठी प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला उपलब्ध आगारांवर तत्काळ रुजू करण्यात येणार आहे.तसेच राज्यातील एकूण ६३९ वीरपत्नींना आजावीन मोफत एसटी प्रवास पास देऊन गौरविण्यात आले आहे. यात सातारा (९० वीरपत्नी), कोल्हापूर (७८), पुणे (७५) आणि सांगली (७१), सोलापूर (३३), रत्नागिरी (३०), सिंधुदुर्ग (३०), अहमदनगर (२९) अशी या जिल्ह्यातील वीरपत्नींचा समावेश आहे. दरम्यान काही वीरपत्नींनी आपली आर्थिक स्थिती चांगली असल्याने मोफत पास नाकारल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.१ मेपासून प्रारंभ : १ मे २०१८ पासून ‘शहीद सन्मान योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सैन्य दलासह अन्य सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नींना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी आजीवन मोफत प्रवास पास देण्यात येत आहे. त्याचबरोबर शहिदांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महामंडळात नोकरी देण्याची घोषणा परिवहन मंत्री आणिएसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली होती.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळMaharashtraमहाराष्ट्र