शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

"आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले, त्यामुळे...", भाजपाचा शरद पवारांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 17:45 IST

कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे. 

BJP on Sharad Pawar  (Marathi News) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण करण्यात आले. यावरून महाराष्ट्र  भाजपाने पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आजपर्यंत त्यांचे आयुष्य दुसऱ्यांचे घर फोडण्यात गेले आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांना यांना रायगडावर यायला वेळ नव्हता, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र भाजपाने ट्विटद्वारे शरद पवार यांच्यावर केली आहे. 

आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने शरद पवार यांना रायगडाची आठवण आली आहे. सहानुभूती निर्माण करुन मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग संवर्धनासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप महाराष्ट्र भाजपाने केला आहे. 

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शरद पवारांना टोला लगावला आहे. किल्ले रायगडावर आज तुतारी वाजली, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता ते म्हणाले की, मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की, ४० वर्षांनंतर शरद पवार हे रायगडावर गेले. अजित पवार यांना या गोष्टीचे क्रेडिट तर द्यावेच लागेल की, त्यांच्यामुळे ४० वर्षांनंतर शरद पवार यांना रायगडावर जावे लागले. त्यामुळे आता तुतारी कशी वाजते? कधी वाजते? कुठे वाजते? किती वाजते? हे भविष्यात कळेल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे.

रायगडावर चिन्हाचा अनावरण सोहळा संपन्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच तुतारी वाजवणारा माणूस हे नवं पक्षचिन्ह दिले आहे. या चिन्हाचे अनावरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी महाराजांच्या कालखंडाचा उल्लेख करत आपल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे आवाहन केले आहे. "आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी कष्ट करावे लागण्याचा हा कालखंड आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या नावाने ही संघटना आपण सर्वांनी उभी केली असून ती मजबूत करायची आहे," अशी साद शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRaigadरायगडPoliticsराजकारण