फाशी दाखवताना जीव धोक्यात...

By Admin | Updated: June 28, 2016 03:27 IST2016-06-28T03:27:44+5:302016-06-28T03:27:44+5:30

फाशी कशी घेतात, याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये घडली.

Life threatens showing execution ... | फाशी दाखवताना जीव धोक्यात...

फाशी दाखवताना जीव धोक्यात...


मुंबई : फाशी कशी घेतात, याचे प्रात्यक्षिक गंमतीने पत्नीला दाखविणाऱ्या पोलिसालाच गळफास लागल्याची विचित्र घटना भांडुपमध्ये घडली. गोविंद देवळे (२६) असे पोलिसाचे नाव असून, तो सशस्त्र पोलीस दलात कार्यरत आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अग्रवाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
मूळचे बीडचे असलेले देवळे यांची २०१४ सशस्त्र पोलीस दलात नेमणूक झाली. घाटकोपर भटवाडी येथील गोळीबार प्रशिक्षण केंद्रात ते पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पत्नी प्रियांका आणि ११ महिन्यांच्या मुलीसोबत ते भांडुप टेंभीपाडा परिसरात राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ते घरी परतले. पत्नीने त्यांना घरात कपडे टाकण्यासाठी दोरी बांधण्यास सांगितले. दोरी नसल्याने देवळेने नायलॉनच्या साडीचे एक टोक लोखंडी खांबाला बांधले. दुसरे टोक बांधत असताना देवळेने गंमत म्हणून फाशी कशी देतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली. हीच गंमत त्यांच्या अंगलट आली.
गळ्याभोवती त्यांनी साडीचे दुसरे टोक बांधले. ही मस्ती सुरू असतानाच त्याचा पायाखालचा टेबल सरकल्याने गळ्याभोवती साडीचा फास आणखीन घट्ट झाला. क्षणात काय झाले हे पत्नीला समजलेच नाही. तिने तत्काळ मदतीसाठी शेजाऱ्यांकडे धाव घेतली.
तेव्हा मदतीसाठी धावलेले घरमालक आणि स्थानिकांनी साडी कापून देवळेला तत्काळ अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. पोलीस नियंत्रण कक्षास देवळेंनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती सुरुवातीला स्थानिकांकडून मिळाली.

Web Title: Life threatens showing execution ...