तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून करणा-याला जन्मठेप

By Admin | Updated: September 9, 2015 13:35 IST2015-09-09T13:35:35+5:302015-09-09T13:35:35+5:30

कुर्ल्यामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या जावेद शेखला विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Life imprisoned for raping a three-year-old girl and raping a murderer | तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून करणा-याला जन्मठेप

तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून करणा-याला जन्मठेप

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - कुर्ल्यामध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणा-या जावेद शेखला विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
चार वर्षांपूर्वी कुर्ला परीसरात बेपत्ता झालेल्या तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. या परीसरात अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून ठार मारण्याच्या घटना घडल्या होत्या. अशावेळी एका लहान मुलीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर पोलीसांनी कसून तपासाला सुरूवात केली आणि शेवटी स्थानिक केबल ऑपरेटरकडे कामाला असलेल्या जावेदला त्यांनी अटक केली. एकूण ४५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले, फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल, वैद्यकीय अहवाल या सगळ्यांच्या आधारे या दुर्दैवी मुलीवर बलात्कार करून पुरावा राहू नये म्हणून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आणि जावेद दोषी असल्याचे सिद्ध झाले. सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी फाशीच्या शिक्षेची मागणी केली, परंतु न्यायाधीशांनी गुन्हा करताना १९ वर्षांचा असलेल्या जावेदला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Life imprisoned for raping a three-year-old girl and raping a murderer