शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

डॉक्टरांचेच ‘लाइफ’ होत आहे कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 3:33 AM

आयुष्य ५५ ते ६० वर्षे; सामान्यांचे वय ६५ ते ७० वर्षे

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून व आजारांतून बाहेर काढणाऱ्या डॉक्टरांचे लाइफ कमी होत आहे. रुग्णसेवेसाठी रात्री-अपरात्री धाव घेण्यासह अनेक कारणांनी डॉक्टरांना ताणतणावाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच अनेक आजारांना डॉक्टरही बळी पडत आहेत. त्यामुळे आयुष्यमान कमी झाल्याची चिंता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.डॉक्टर होण्यापर्यंत व नंतरच्या प्रवासात डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठा काळ जातो. चोवीस तास उपलब्ध राहावे लागते. रात्री कितीही वाजता धाव घ्यावी लागते.इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणातून सामान्य व्यक्तीपेक्षा डॉक्टरांचे लवकर मृत्यू होत असल्याचे आढळून आले. सर्वसामान्यांचे आयुष्यमान ६५ ते ७० वर्षे आहे. मात्र, डॉक्टरांचे आयुर्मान ५५ ते ६० वर्षांदरम्यान असल्याचे समोर आले आहे. काम अधिक व वेळेअभावी पुरेसा आहार, व्यायामाकडेही दुर्लक्ष, नोकरीच्या ठिकाणी व रुग्णालयात होणारी कामाची कसरत, स्पर्धेत टिकून राहण्याचे आव्हान, रुग्णांची वाढती संख्या, नातेवाईकांकडून मारहाणीची भीती, अशा कारणांनी ताणतणाव वाढत जातो.पुरेशी काळजी घेतल्यानंतरही आजारांचा संसर्ग होणे, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि त्यातूनच अनेक आजारांना बळी पडण्याची वेळ डॉक्टरांवर येत आहे. यातून हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, हायपरटेंशन, मधुमेह यांचे प्रमाण डॉक्टरांमध्येही वाढत आहे. हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकारांनी डॉक्टरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.स्वत:चीही काळजी घ्यावीसर्वेक्षणातून डॉक्टरांचे आयुष्य ५५ ते ६० वर्षे, तर सर्वसामान्य व्यक्तीचे आयुष्य ६५ ते ७० वर्षे इतके असल्याचे दिसून आले आहे. डॉक्टरांची जीवनशैली तणावपूर्ण आहे. त्यातून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी रुग्णांबरोबर डॉक्टरांनी स्वत:चीही काळजी घेणे गरजेचे आहे.- डॉ. शोएब हाश्मी, व्यवस्थापकीय संचालक, एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :doctorडॉक्टर