शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या लेझिम पथकाने ‘राजपथ’ जिंकले

By admin | Updated: January 30, 2015 00:59 IST

नागपूर शहराचा कायापालट करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. हे शहर ‘मेट्रो सिटी’ करण्यासाठी प्रयत्न असताना सांस्कृतिक क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय स्तरावरचा प्रोत्साहन पुरस्कार : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा नागपूर : नागपूर शहराचा कायापालट करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. हे शहर ‘मेट्रो सिटी’ करण्यासाठी प्रयत्न असताना सांस्कृतिक क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण आहे. नागरी सोयींसह कुठल्याही शहराची ओळख त्याच्या सांस्कृतिक वातावरणाने होत असते. समृद्ध सांस्कृतिक संचित असलेल्या शहराच्या शिरपेचात यंदाच्या गणतंत्र दिन परेडमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेल्या ‘लेझिम पथकाला’ राष्ट्रीय स्तरावरील प्रोत्साहन पुरस्कार मिळाल्याने नागपूरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. राजपथावर आर. डी. परेडमध्ये सादर केलेल्या या लेझिम नृत्याने देशवासीयांची मने जिंकली आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या उपक्रमांतर्गत महानगरपालिका आणि काही खाजगी शाळांच्या एकूण १६० विद्यार्थ्यांनी परिश्रमाने लेझिम नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करुन देशवासीयांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही जिंकले. एकूण २० शाळांतील विद्यार्थ्यांची निवड या नृत्यासाठी करण्यात आली. यासाठी या विद्यार्थ्यांनी तब्बल पाच महिन्यांची तालिम केली होती. केंद्रातर्फे विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी मोठी प्रक्रिया राबविण्यात आली. यातून नृत्याचे ज्ञान असणाऱ्या १६० विद्यार्थ्यांची निवड केंद्रातर्फे करण्यात आली. निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी डिंसेंबर महिन्यात काँग्रेसनगर येथील होम गार्ड प्रांगणात महिनाभर नृत्याची तालिम केली. त्यानंतर या लेझिम पथकाला गणतंत्र दिन परेडसाठी ३ जानेवारी रोजी दिल्ली येथे रवाना करण्यात आले. २२ जानेवारीपर्यंत १६० विद्यार्थ्यांनी नियमित सराव केला. त्यानंतर २४ जानेवारी रोजी नृत्यासाठी लागणाऱ्या वेशभूषेसह नृत्याची रंगीत तालिम घेण्यात आली. जंगी स्वागत होणार २६ जानेवारीला राजपथावर विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले आणि सर्वांनीच या नृत्याची प्रशंसा केली. नृत्य चांगले आणि शिस्तबद्धतेने सादर केल्याचे समाधान केंद्र अधिकारी आणि विद्यार्थ्यांना होतेच. पण या नृत्याला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक लाभल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अद्याप हे विद्यार्थी कलावंत नागपुरात पोहोचले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी हे सर्व यशस्वी विद्यार्थी कलावंत नागपुरात पोहोचणार आहेत आणि त्यांचे जंगी स्वागत नागपूरकरांतर्फे करण्यात येणार आहे. नागपूरच्या लेझिम पथकाने ओबामा यांना इतके प्रभावित केले की ‘व्हाईट हाऊस’च्या संकेतस्थळावर त्यांच्या निर्देशांनुसार या परेडचा हा फोटो ‘अपलोड’ करण्यात आला आहे. ‘फोटो आॅफ द डे’ असाही या फोटोचा उल्लेख करण्यात आला आहे. हे लेझिम नृत्य बसविण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर शेलार यांनी परिश्रम घेतले. शेलार यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे. कलावंत निवडण्याचे कामही त्यांनीच केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी जिद्दीने या नृत्यात जीव ओतला आणि यश खेचून आणले. दिल्ली येथे केंद्राचे अधिकारी प्रेमस्वरूप तिवारी, सतीश वानखेडे आणि कोरिओग्राफर शेलार गेले आहेत. याप्रसंगी प्रेमस्वरूप तिवारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे गेल्यावर तेथल्या वातावरणाशी जुळवून घेत परिश्रम घेतले आणि सातत्याने गांभीर्याने सराव केला.