‘जेएनईसी’ची मान्यता रद्द करण्याचे पत्र

By Admin | Updated: March 2, 2017 04:43 IST2017-03-02T04:43:33+5:302017-03-02T04:43:33+5:30

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘रेकॉर्ड’वर घेतला.

Letter of cancellation of approval of JNEC | ‘जेएनईसी’ची मान्यता रद्द करण्याचे पत्र

‘जेएनईसी’ची मान्यता रद्द करण्याचे पत्र


औरंगाबाद : येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) येथील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याबाबतचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ‘रेकॉर्ड’वर घेतला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार यांनी २०१० साली औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २००६ पासून सहाव्या वेतन आयोगानुसार (एआयसीटीईच्या वेतनश्रेणीनुसार) वेतनश्रेणी लागू करावी व फरकाची रक्कम द्यावी, अशी विनंती केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Letter of cancellation of approval of JNEC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.