शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला जमीन दाखवणाऱ्या भाजपला अस्मान दाखवू; अमित शाह यांच्या हल्ल्यावर उद्धव ठाकरे यांचा प्रतिहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:20 IST

ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी ते सोडले नसते.

मुंबई : मुंबईत मंगलमूर्ती विराजमान झालेल्या आहेतच. काल एक अमंगल मूर्ती आले होते. शिवसेनेला जमीन दाखवायची आहे, असे ते बोलून गेले. त्यांना काय बोलायचे ते बोलू देत, पण आपण भाजपला पालिका निवडणुकीत अस्मान दाखवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणावर दिली.

ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी मुंबईतील विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाहचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, शिवसेनेला जमीन दाखवायची भाषा अमित शाह यांनी केली. त्यांना गणपतीच्या मंडपातही राजकारण दिसते. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत, पण या संघर्षाच्या काळात जो सोबत राहतो तो आपला. 

यावेळी भास्कर जाधव, अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील प्रभू व अन्य आमदार उपस्थित होते. त्यांच्याकडे निर्देश करताना ते म्हणाले की, याही आमदारांना ते लालूच दाखवून नेऊ शकत होते, पण ते नेऊ शकले नाहीत. कारण निष्ठा हा असा विषय असतो की, त्याची कितीही किंमत लावली, तरी ती विकली जाऊ शकत नाही.

...तर क्षणात मुख्यमंत्रिपद सोडले नसतेठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रिपद जर मला पाहिजे असते तर एका क्षणात मी ते सोडले नसते. आपल्यासोबत तीस ते चाळीस आमदार होते. मीही त्यांना डांबून ठेवून शकलो असतो. माझीही  ममता बॅनर्जींकडे ओळख होती. मीही त्यांना कोलकात्याला  घेऊन जाऊ शकलो असतो. राजस्थानला नेले असते, पण माझा तो स्वभाव नाही. 

दसरा मेळाव्यात काय बोलायचे ते बोलणार -राहायचे असेल तर निष्ठेने राहायचे. मनात शंका-कुशंका घेऊन राहायचे नाही. ज्यांना राहायचे त्यांनी निष्ठेने राहा, पण एक समाधान आहे की, माझ्यासोबत जे आहेत ते कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हेच आपले शिवसेनेचे वैभव आहे. दसरा मेळाव्यात आपल्याला काय बोलायचे ते बोलणारच आहे, आता तर मुख्यमंत्रिपदाचा मास्कही नसेल, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शाहBJPभाजपा