अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:29 IST2025-02-10T10:29:16+5:302025-02-10T10:29:45+5:30

प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होते.

Let's go to Ayodhya! Travel, accommodation and food are free; How to apply, what are the criteria for beneficiaries? | अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय?

अयोध्येला चला! प्रवास, राहणे अन् खाणेही मोफत; अर्ज कसा करायचा, लाभार्थ्यांचे निकष काय?

मुंबई - राज्य सरकारने ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना भेट देता यावी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे. यामध्ये मुंबई शहरातील १५०, उपनगरातील २५० अशा एकूण ४०० ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर दर्शनाचा लाभ घेतल्याचे आता समोर आले आहे.

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील ६६, तर देशातील ७३ महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शनाची सुविधा मिळते. यामध्ये  महाराष्ट्रातील ६६ तीर्थस्थळांमध्ये मुंबईतील १५, तर ठाण्याच्या २ तीर्थस्थळांचा समावेश आहे. पात्र व्यक्तीला प्रमुख तीर्थस्थळांपैकी कोणत्याही एका तीर्थयात्रेचा एकदाच लाभ घेण्याची सुविधा मिळते

अर्ज कसा कराल? 
पोर्टलवर ऑनलाईन वा स्वत: सेतू सुविधा केंद्रात अर्ज विनामूल्य भरता येतो. अर्ज भरताना अर्जदार प्रत्यक्ष हजर असणे आवश्यक आहे. फोटो काढून केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. 

लाभार्थ्यांचे निकष काय? 
प्रत्येक तीर्थस्थळासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड होते. अतिरिक्त लोकांची प्रतीक्षायादी तयार केली जाते. अर्जदार पती, पत्नीपैकी एकाची निवड झाल्यास जोडीदाराला पाठविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समिती घेते. अर्जदाराचे वय ७५ आणि त्यापुढील असल्यास सोबत जोडीदार वा एक साहाय्यक प्रवास करू शकतो.

एका टूरसाठी ८०० प्रवासी आवश्यक असल्याने मुंबईतून फक्त अयोध्येत श्रीराम मंदिर दर्शन टूर गेली आहे. यात मुंबई व ठाण्यातून  प्रत्येकी ४०० जणांचा समावेश होता - प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग

Web Title: Let's go to Ayodhya! Travel, accommodation and food are free; How to apply, what are the criteria for beneficiaries?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.