‘धारावीचा पुनर्विकास आम्हालाच करू द्या’
By Admin | Updated: August 15, 2016 03:27 IST2016-08-15T03:27:30+5:302016-08-15T03:27:30+5:30
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी चार वेळा जागतिक निविदा काढूनही एकही विकासक पुढे आलेला नाही.

‘धारावीचा पुनर्विकास आम्हालाच करू द्या’
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी चार वेळा जागतिक निविदा काढूनही एकही विकासक पुढे आलेला नाही. परिणामी, धारावीतील सेक्टर १चा पुनर्विकास आम्हा रहिवाशांनाच करू द्या, अशी मागणी डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.
धारावीतील झोपडीधारकांना ३५० चौरस फुटांचे घर तर इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ४०५ चौरस फुटांचे मोफत घर देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने घेतल्यानंतर, या प्रकल्पासाठी जागतिक पातळीवर चार वेळा निविदा काढण्यात आल्या. यासाठी निविदापूर्व बैठकीत १६ विकासकांनी रस दाखविला. मात्र, या निविदेमध्ये अनेक जाचक अटी आहेत. त्यामुळे त्या शिथिल केल्यास निविदा दाखल करण्याची तयारी संबंधितांनी दाखविली. विकासकांच्या मागणीप्रमाणे अटींमध्ये सुधारणा करण्यासह चार वेळा मुदतवाढ देऊनही विकासक पुढे येत नसल्याने सरकार हतबल झाले आहे. परिणामी, ही निविदा प्रक्रियाच रद्द करून रहिवाशांनाच स्वयं-पुनर्विकासाचा अधिकार द्यावा, अशी मागणी संघाने केली आहे. (प्रतिनिधी)