शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"...त्या कबरीवर काँग्रेसचा झेंडा लावा, शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला शांती मिळेल"; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 20:36 IST

...आमच्या त्या कबरीवर  शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे. नेते मंडळींचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप, यांमुळे संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. यातच आता शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय जहरी शब्दात टीका केली आहे. "आम्हाला गाडलं पाहीजे, आमच्या त्या कबरीवर  शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गाडलं पाहीजे, या वक्तव्यावर बोलतांना संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर थेट हल्ला चढवत जहरी शब्दात टीका केली. ते म्हणाले, "गाडलं पाहीजे, आम्हाला खरंच गाडलं पाहीजे. कारण आम्ही शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चाललो. आम्हाला यासाठी गाडलं पाहीजे की, तुम्ही ज्यांच्यासोबत गेलेले आहात, ज्यांच्या बरोबर कधीच जाऊ नका, असं बाळासाहेब म्हणाले, त्यांच्यासोबत गेले आहात. शरद पवारांसोबत गेलात, काँग्रेस सोबत गेलात. आम्हाला गाडलं पाहीजे, आमच्या त्या कबरीवर  शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल. अशा शब्दात शिवसेना (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली." ते एबीपी माझासोबत बोलत होते.

उद्धव ठाकरेंच्या लोकल प्रवासावर काय म्हणाले? - लोकलने प्रवास केला ना? आता ही इव्हेंट करायची वेळ यांच्यावर आली आहे. उद्या यांनी शिवसेना भवनाच्या बाजूला जाऊन वडापाव खाल्ला तरी हे लोक त्याचाही इव्हेंट करतील. यामुळे आता यांच्याकडे इव्हेट करण्याशिवाय काही पर्याय नाही. कालची पालघरची फ्लॉप झालेली सभा आणि त्या घोडबंदर रोडवर असलेली ट्राफिक, पर्याय म्हणून काल ते लोकलने आले आणि त्याचाही इव्हेंट केला. ते एकाही सर्वसामान्य माणसासोबत बोलले नाहीत. लोकलमध्ये बसून मुलाखत करत होते. कसाही आमचा टीआरपी वाढवा, असे शिरसाट म्हणाले.

सर्वसामान्य मुंबईकर रोज लोकलने प्रवास करतो -शिरसाट म्हणाले, अरे सर्वसामान्य मुंबईकर रोज लोकलने प्रवास करतो. जीव घेना प्रवास, संध्याकाळच्या गर्दीत कधीतरी लोकलमध्ये चढून दाखवा फक्त. जीव मुठीत घेऊन प्रवास करणार माझा मुंबईकर, त्याचीही काल तुम्ही थट्टा उडवली आहे. तो रोज करतो आपल्या जीवनाची संसाराची गाडी चालवतो. त्यांच्या व्यथा तरी त्यांनी समजून घ्यायला हव्या होत्या. पण ते न करता राजाने आता लोकलमध्ये प्रवास केला. हे दाखवण्याचा जो काही पागलपणा केला, ते लोकांना रुचणार नाही.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे