शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

काेराेना काळात राज्यात आर्थिक गुन्ह्यांमध्ये घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 08:53 IST

२०२० मध्ये १२ हजारांहून अधिक गुन्हे दाखल

ठळक मुद्दे२०२० मध्ये १२ हजारांहून अधिक गुन्हे दाखल

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : काेराेना महामारीच्या गेल्या वर्षभराहून अधिक काळात महाराष्ट्रात आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे. काेराेनामुळे वर्षातील बहुतांश कालावधीत राज्यात लाॅकडाऊन आणि कठाेर निर्बंध लागू करण्यात आले हाेते. यादरम्यान गेल्या वर्षी १२ हजारांहून अधिक आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत आर्थिक गुन्ह्यांमध्ये घट नाेंदविण्यात आली आहे. त्यापैकी १० हजारांहून अधिक गुन्हे हे फसवणुकीचे हाेते. तर दीड हजारांहून अधिक प्रकरणे आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित हाेते. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या एक लाखांहून अधिक प्रकरणांचा तपास अजूनही प्रलंबितच आहे.

राष्ट्रीय गुन्हेगारी रेकाॅर्ड ब्युराेच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण १२ हजार ४५३ आर्थिक गुन्हे दाखल झाले. त्यापैकी १० हजार ७७० गुन्हे फसवणुकीचे हाेते. १६२९ गुन्हे आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित हाेते. केवळ ५३.७ टक्के प्रकरणांमध्येच आराेपपत्र दाखल केले आहे. त्यापूर्वी २०१९मध्ये १५६८६, २०१८मध्ये १४८५४ आणि २०१७मध्ये १३९४१ गुन्हे दाखल झाले हाेते. आतापर्यंतच्या २७ हजार ७०५ प्रकरणांचा तपास अजूनही अपूर्णच आहे. या कालावधीत २ प्रकरणांचा तपास नव्याने सुरू करण्यात आला. तर १३ प्रकरणांचा तपास इतर तपास संस्थांकडे हस्तांतरित करण्यात आला. याशिवाय ५ प्रकरणे सरकारनेच मागे घेतली.

४,६२२ प्रकरणात पुरावेच नाहीत 

तब्बल ४ हजार ६२२ प्रकरणे पुराव्यांअभावी बंद करण्यात आली. तर २१४ प्रकरणी अंतिम अहवालच बाेगस हाेता. तसेच ११ हजार ९४६ प्रकरणांचा निपटारा पाेलिसांच्या माध्यमातूनच करण्यात आल्याचे हा अहवाल सांगताे.nराज्यात २०२१ वर्षापूर्वीपासूनचे १ लाख ५ हजार ६३६ प्रकरणे विवध न्यायालयात प्रलंबित हाेती. त्यापैकी १ लाख २६२ प्रकरणे २०२० पासून प्रलंबित आहेत.

विशेष म्हणजे २०२० मध्ये राज्यात आर्थिक गैरव्यवहाराचे एकही प्रकरण समाेर आले नाही. त्यातुलनेत देशभरात १११ प्रकरणांची नाेंद झाली. त्यापैकी सर्वाधिक ९२ गुन्हे उत्तरप्रदेशात दाखल झाले. त्याखालाेखाल तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये प्रत्येक ५५ गुन्हे नाेंदविण्यात आले.

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र