पुणे शहरात जूनमध्ये २१ वेळा सरासरीपेक्षा कमी पाऊस

By Admin | Updated: June 30, 2016 19:49 IST2016-06-30T19:49:15+5:302016-06-30T19:49:15+5:30

मान्सूनने कोकणासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असली तरी पुणे शहर व परिसरात जून संपला तरी अजून मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे़.

Less than 21 times in Pune city in June, | पुणे शहरात जूनमध्ये २१ वेळा सरासरीपेक्षा कमी पाऊस

पुणे शहरात जूनमध्ये २१ वेळा सरासरीपेक्षा कमी पाऊस

५० वर्षांतील स्थिती : २०१४ ला केवळ १३़८ मिमी
विवेक भुसे
पुणे : मान्सूनने कोकणासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली असली तरी पुणे शहर व परिसरात जून संपला तरी अजून मोठा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे़. यंदा जूनमध्ये पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा निम्माही पाऊस झाला नाही़ गेल्या ५० वर्षांतील वेधशाळेतील आकडेवारी पाहिली असता पुणे शहरात जूनमध्ये सरासरीपेक्षा २१ वेळा कमी पाऊस पडला आहे़ त्यामध्ये २०१४ मध्ये सर्वात कमी १३़८ मिमी पावसाची नोंद झाली होती़ .

पुणे शहरात जून महिन्यात सरासरी १३७़७ मिमी पाऊस पडतो़ यंदा ३० जूनअखेरपर्यंत ५९ मिमी पाऊस झाला आहे़ हा गेल्या ५० वर्षातील आठव्या क्रमांकाचा निचांकी पाऊस झाला आहे़ गेल्या ५० वर्षात केवळ ४ वर्षी ५० मिमीपेक्षा पाऊस जूनमध्ये झाला होता़ याअगोदर २०१२ आणि २०१४ तसेच १९७४ आणि १९७२ मध्ये जून महिन्यात ५० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला होता़ या सर्व वर्षी वर्षभरातील पाऊसही सरासरीपेक्षा कमी पडला होता आणि ही सर्व वर्षे तीव्र दुष्काळाची म्हणून गणली गेली होती़. 

हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा १०३ टक्के पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे़ हा अंदाज संपूर्ण देशासाठी असला तरी जूनमध्ये सरासरीच्या ८७ टक्के इतका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून जुलै आणि आगस्टमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ पण, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात यंदा जूनमध्ये अतिशय कमी पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर पावसाचे दिवस दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत़

आदल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस आणि जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ यामुळे धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे़ पुणे शहराचा सरासरी पाऊस ७६० मिमी आहे़ गेल्या वर्षी सरासरीपेक्षा थोडा जास्त (८२९ मिमी) पाऊस झाला होता़ पण, वाढते शहरीकरण आणि अन्य शहरांसाठी धरणातून पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय यामुळे यंदा २८ जूनअखेर खडकवासला धरणात १़५४ टीएमसी पाणीसाठा होता़ अशीच स्थिती २०१२ ला १़१२, २०१० ला १़१७ आणि २००९ मध्ये ़७२ टीएमसी पाणीसाठा धरणात होता़ यंदा इतकी यापूर्वी पाण्याची इतकी आणीबाणीची स्थिती यापूर्वी कधी उद्भवली नव्हती़
---
* १९९१ मधील जूनमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक ५२९़.५ मिमी पाऊस झाला होता़ वर्षभरात झालेल्या एकूण पावसापैकी त्यावर्षी निम्मा पाऊस जूनमध्ये पडला होता़

* पानशेत धरण १२ जूलै १९६१ फुटले होते़ त्याला कारणही त्यावर्षी जूनमध्ये झालेला पाऊस कारणीभूत ठरला होता़

* २६ जून १९६१ रोजी पुणे शहरात एकाच दिवशी सर्वाधिक १३१़.९ मिमी पावसाची नोंद झाली होती़

जूनमध्ये सर्वांत कमी पाऊस
वर्ष पाऊस (मिमी)
२०१४     १३़.८
२०१२    ३४़ ५
२००१    ७८़ ६
१९९८    ९५़ ७
१९९२    ८५़ .८
१९८८     ६७़ .०
१९८७     ७२़ .७
१९८२     ५४़ .१
१९७४    १९़ ७
१९७३     ७४़.४
१९७२   ३५़.४
१९७१   ६५़.९
१९७०    ८४़ .४

जूनमध्ये कमी पावसाचा वार्षिक पावसावर परिणाम
जूनची पुणे शहरातील सरासरी १३७़७ मिमी आहे़ पुणे शहरात जूनमध्ये ज्या वर्षी कमी पाऊस पडला, त्यातील काही वर्षांचा अपवाद वगळता बहुतांश वर्षी पावसाने सरासरी गाठलेली दिसून येत नाही़ त्यावर्षी राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती़ १९७० ते १९७४ अशी सलग ४ वर्षे जूनमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला होता़ त्यामध्ये सलग १९७० ते ७२ अशा तीन वर्षी दुष्काळी स्थिती होती़ १९७२ मध्ये ३८८़२ हा वर्षभरात पडलेला पुणे शहरातील सर्वात कमी पावसाचे वर्ष ठरले आहे़
..............

सर्वाधिक पावसाची वर्षे (जून महिना)

वर्षे पाऊस (मिमी)
२०१३     २६१़
२०११    २५६़
२०१०   २८६़
२००५   २९२़
१९९७ २८७़
१९९४ ३१३
१९९१ ५२९़
१९८६ २६४
१९८० २५९़
१९७६ २७१़

Web Title: Less than 21 times in Pune city in June,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.