मुंबईत लेप्टोचा दुसरा बळी

By Admin | Updated: August 5, 2014 03:47 IST2014-08-05T03:47:25+5:302014-08-05T03:47:25+5:30

मुंबईमध्ये 11 दिवसांत लेप्टोचा दुसरा बळी गेला आहे. केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 48वर्षीय पुरुषाचा लेप्टोमुळे 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे.

Lepto's second victim in Mumbai | मुंबईत लेप्टोचा दुसरा बळी

मुंबईत लेप्टोचा दुसरा बळी

मुंबई : मुंबईमध्ये 11 दिवसांत लेप्टोचा दुसरा बळी गेला आहे. केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 48वर्षीय पुरुषाचा लेप्टोमुळे 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे.
हा इसम भांडुप येथे कामगार म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याला 23 जुलै रोजी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. पहिल्यांदा त्याची तपासणी केल्यावर लेप्टो निगेटिव्ह आला होतो. कस्तुरबा रुग्णालयात अजून एक तपासणी करण्यात आली होती. यामध्ये त्याला लेप्टो झाल्याचे स्पष्ट झाले होते. 1 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख 
डॉ. मंगला गोमारे यांनी 
सांगितले. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Lepto's second victim in Mumbai