शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात फासकीत अडकलेल्या बिबट्याची अखेर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 13:47 IST

थरार कॅमेरामध्ये कैद : दोडामार्ग गिरोडे येथील जंगलातील घटना

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील गिरोडे येथील जंगलात अज्ञात शिकाऱ्याने लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याने गावात एकच खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. फासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची चाललेली धडपड आणि त्याने धारण केलेले आक्राळ-विक्राळ रूप पाहून बघ्यांची पाचावर धारण बसली. वनविभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले, मात्र अथक प्रयत्नानंतर बिबट्याने स्वत:ची सुटका करून घेत जंगलात धूम ठोकली. 

दोडामार्ग तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या बरीच आहे. त्यात बिबट्या, रानडुक्कर, गवेरेडे, सांबर यांचा प्रामुख्याने समावेश असतो. त्यामुळे शिकारीचे प्रमाणही वाढले आहे. तालुक्यात रानडुकरांसाठी फासकी लावण्याचे प्रमाण अधिक आहे. फासकीत जंगली प्राणी पकडून त्यांची शिकार केली जाते. अशाचप्रकारे शिकारीसाठी गिरोडेच्या जंगलात लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. ही फासकी एका तोडलेल्या लाकडाच्या पाच फूट लांब ओंडक्याला बांधलेली होती. बिबट्याने जीवाच्या आकांताने फासकी ओढत नेत तेथीलच शाणी गवस यांच्या काजू बागेपर्यंत मजल मारली. मात्र तेथे फासकीला लावलेला ओंडका अडकल्याने त्याला पुढे जाता येईना. 

फासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याने आक्राळविक्राळ रूप धारण केले होते. त्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणून गेला होता. गिरोडे गावात आपल्या काजू बागायतीत जाताना तेथीलच शेतकरी नंदू गवस यांच्या निदर्शनास फासकीत अडकलेला बिबट्या आला. याबाबतची माहिती त्यांनी वनअधिकारी आणि गावकऱ्यांनाना दिली. एव्हाना बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. वनाधिकारी देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पकडण्यासाठी सावंतवाडीतून जाळी मागविण्यात आली. मात्र तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याने फासकीतून स्वत:ची सुटका करून घेत जंगलात पळ काढला आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. 

बिबट्याच्या रौद्र रूपाने अंगावर काटेफासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची चाललेली धडपड आणि त्यात येणाऱ्या अपयशामुळे त्याने धारण केलेला आक्राळविक्राळपणा अंगावर काटा आणणारा होता. फासकी आणि लाकडाच्या ओंडक्यासहीत शेजारच्या आंब्याच्या झाडावर चढलेला बिबट्या आणि त्याच्या नखांचे झाडावर आलेले ओरबाडे  अक्षरश: काळजात धडकी भरविणारे होते. 

...तर अनर्थ घडला असताफासकीतून सुटका करून घेण्यासाठी बिबट्याची जवळपास तीन तासाहून अधिक काळ धडपड सुरू होती. यादरम्यान बघ्यांची गर्दीही बरीच झाली. बिबट्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी जमली. मात्र ध्यानीमनी  नसताना बिबट्याने स्वत:ची सुटका करून घेत दोन्ही बाजूच्या बघ्यांच्या मधून जंगलात पळ काढला. जर लोकांच्या दिशेने बिबट्या आला असता तर अनर्थ घडला असता. 

टॅग्स :leopardबिबट्याDodamarg police stationदोडामार्ग पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग