शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भूसंपादनामध्ये होणारी लूट  थांबविण्यासाठी कायदा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 05:48 IST

सुभाष देसाई; जमिनीचे दर वाढल्यास मूळ मालकाला ५० टक्के रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रकल्पांची घोषणा झाल्यानंतर कमी किमतीत जमीन खरेदी करायची आणि भूसंपादनात त्याच जमिनींसाठी भरघोस नुकसानभरपाई उकळण्याच्या प्रकारांना आता चाप बसणार आहे. त्यासाठी लवकरच राज्याच्या भूसंपादन कायद्यात सुधारणा करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत दिली.एखाद्या प्रकल्पासाठी पहिली अधिसूचना निघाल्यानंतर जमिनीचा व्यवहार झाला असेल आणि नंतर जमिनीचा दर वाढला तर जमिनीच्या एकूण मोबदल्याची ५० टक्के रक्कम जमिनीच्या मूळ मालकाला मिळेल, असे देसाई यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क आणि जेएसडब्ल्यू कंपनीसाठी सरकार सक्तीने भूसंपादन करत असल्याने असंतोष वाढत असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केला होता. चर्चेला उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, रायगड जिल्ह्यात औद्योगीकरणासाठी १७ हजार हेक्टर  जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या संमतीने आणि सर्वोच्च मोबदला देऊनच जमीन संपादन केले जाणार आहे. जमिनीचे लगेच वाटप होऊ शकेल, विकली जाईल अशा प्रकल्पांसाठीच भूसंपादन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रॅग पार्कचा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. वेळीच कार्यवाही न झाल्यास हा प्रकल्प अन्य राज्यात जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भातील गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. एक लाख रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पात असल्याचे देसाई यांनी सांगितले.

होळीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी बैठक होळीच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदा वाहतूककोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जातील. या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभागाची बैठक घेतली जाईल. महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा घेत आवश्यक उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

जि. प. शाळांना सवलतीत वीजजिल्हा परिषदेसह विविध शाळांना व्यावसायिक वीज दराऐवजी उद्योग अथवा तत्सम वर्गाचे दर लागू करण्याबाबत ऊर्जा विभागाला पत्र पाठविले आहे. याबाबतची चाचपणी सुरू असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली.

तूर्तास भारनियमन नाही - नितीन राऊतराज्यात तूर्त तरी भारनियमनाचा मुद्दा नाही, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी  विधान परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना  विजेअभावी पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा करण्याचे सरकारचे नियोजन असून त्या दृष्टीने काम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वीज देयकांची दुरुस्ती वेळीच झाली पाहिजे यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाई