दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

By Admin | Updated: February 21, 2017 11:25 IST2017-02-21T08:53:48+5:302017-02-21T11:25:35+5:30

राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक दिग्गजांनीही मतदानाचा अधिकार बजावला

Legends gave the right to vote | दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक दिग्गजांनीही मतदानाचा अधिकार बजावला. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरूवात होताच सरसंघचालच मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केले तसेच नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गोरेगांव पूर्वेकडील बिंबीसार नगर  येथे मतदान केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरमध्ये मतदान केले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही कुटुंबीयांसह मतदान केले. 
 
तर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेही मतदान करत सर्वांना आपला हक्क बजावण्याते आववाहन केले. तसेच ज्येष्ठ गीतकार गुलजार, अभिनेत्री रेखा, टीना अंबानी, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी मतदान केले. 

Web Title: Legends gave the right to vote