शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे मतदारसंघ सोडून भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:23 IST

युतीसाठी सकारात्मक संकेत; दोन्ही पक्षांच्या नेत्यांची गुप्त ठिकाणी बैठक

मुंबई : शिवसेनेकडे असलेले लोकसभा मतदारसंघ सोडून उर्वरित मतदारसंघात भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे, युती व्हावी, ही लोकांची इच्छा असून अंतिम निर्णय उद्धवजी घेतील, असे सांगत गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनीही युतीबाबत सकारात्मक संकेत दिले.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने लढविलेल्या मतदारसंघाचा आढावा दोन दिवसांपासून ‘वर्षा’ बंगल्यावर घेणे सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे हेही उपस्थित आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे एक ज्येष्ठ मंत्री यांच्यात चर्चेच्या फेऱ्या गुप्त ठिकाणी सुरू आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मातोश्रीवर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणमधील मतदारसंघाचा आढावा घेतला. शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ पाचोरा (जि.जळगाव) येथे १५ फेब्रुवारीला फोडण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पाचोरा शहर ज्या जळगाव मतदारसंघात येते, तो भाजपाकडे आहे.भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंना फोनभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ‘शिवसेना हा भाजपाचा सर्वात जुना मित्र पक्ष आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आहोत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने युती लवकर होणे आवश्यक आहे, अशी भावना अमित शहा यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAmit Shahअमित शहाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९