नेत्यांनो, जमिनीवर या - सुप्रिया सुळे

By Admin | Updated: January 23, 2015 02:11 IST2015-01-23T02:11:02+5:302015-01-23T02:11:02+5:30

सत्ता गेली तरी आमचे नेते अजूनही गाड्यांमधून फिरत असतील तर ती गंभीर बाब आहे.

Leaders, on the ground - Supriya Sule | नेत्यांनो, जमिनीवर या - सुप्रिया सुळे

नेत्यांनो, जमिनीवर या - सुप्रिया सुळे

मुंबई : सत्ता गेली तरी आमचे नेते अजूनही गाड्यांमधून फिरत असतील तर ती गंभीर बाब आहे. जॉर्ज फर्नांडिस, एन.डी. पाटील यांच्यासारखे नेते सत्तेवरून गेल्यानंतरही त्यांच्याविषयी आदरभाव कायम असतो, ही बाब आमच्या नेत्यांनी लक्षात घ्यावी. आपण कुठे चुकतो, यावर आत्मचिंतन करावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वपक्षाला खडे बोल सुनावले. खा. सुळे यांनी आज निवडक माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून राष्ट्रवादीबद्दलचे ‘स्वगत’ व्यक्त केले. त्या म्हणाल्या, पक्षात अजूनही कंत्राटदार अथवा कंत्राटदारधार्जिणे लोक असतील तर त्यांना दूर केले पाहिजे.
अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे यासारख्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मीडिया ट्रायलही झाली. आम्ही आरोप परतावून लावायला हवे होते पण तसे झाले नाही. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Leaders, on the ground - Supriya Sule