एलबीटी रद्दला पीएमपी कामगार संघटनेचा विरोध
By Admin | Updated: June 5, 2014 22:25 IST2014-06-05T21:53:46+5:302014-06-05T22:25:55+5:30
महापालिकेचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.

एलबीटी रद्दला पीएमपी कामगार संघटनेचा विरोध
पुणे : महापालिकेचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. राज्य शासनाने मुठभर व्यापा-यांच्या दबावाखाली एलबीटी रद्द करू नये. अन्यथा पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या महासचिव मुक्ता मनोहर यांनी दिला आहे.
शहराची लोकसंख्या ४० लाख असून, ६८ हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. तर ६५ हजार व्हॅटधारक व्यापारी आहेत. अद्याप तीन हजार व्यापारी कोणत्याही कराचा भरणा करीत नाहीत. केवळ २५ हजार व्यापारी एलबीटीचा भरणा करीत आहेत. त्यामुळे मूठभर व्यापा-यांना खुश करण्यासाठी महापालिकेचे अर्थिक नुकसान करू नये. त्याविषयी विचारविनीमय करण्यासाठी उद्या (शुक्रवारी) आंदोलन करणार आहे, असे मुक्ता मनोहर यांनी सांगितले.