अशिलावर बलात्कार प्रकरणी वकिलास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 19:52 IST2019-05-03T19:52:00+5:302019-05-03T19:52:08+5:30

मीरारोड - पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या एका २० वर्षीय अशील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्या सोबत शरीर संबंध ठेऊन ती ...

lawyer arrested for rape on lady | अशिलावर बलात्कार प्रकरणी वकिलास अटक

अशिलावर बलात्कार प्रकरणी वकिलास अटक

मीरारोड - पासपोर्टच्या कामासाठी आलेल्या एका २० वर्षीय अशील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्या सोबत शरीर संबंध ठेऊन ती गरोदर राहिल्यावर देखील लग्नास नकार देणाऱ्या वकिलास मीरारोडच्या नया नगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अविनाश राजु विश्वकर्मा (२८) रा. आरएनपी पार्क, भार्इंदर (पुर्व ) असे अटक केलेल्या वकिलाचे नाव आहे. पिडीत ही ऑर्केस्ट्रा बार मध्ये गायीका असुन पासपोर्ट बनवण्याच्या कामा निमित्त तिची ओळख सुमारे सहा महिन्यांपुर्वी ठाणे न्यायालयात विश्वकर्मा याच्याशी झाली होती. कामा निमित्ताने झालेल्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले. विश्वकर्मा याने पिडीतेला लग्नाचे आश्वासन दिले होते. दोघांमध्ये शरीर संबंध होऊन तरुणी गरोदर राहिली. त्यावेळी देखील तरुणीने लग्नाचा आग्रह धरला.

पण नंतर लग्न करु असं सांगुन चार महिन्याची गरोदर असताना विश्वकर्माने एका खाजगी रुग्णालयात नेऊन तीचा गर्भपात घडवून आणला. त्या नंतर मात्र तो लग्नास नकार देऊ लागल्याने अखेर तीने नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहेल पठाण यांनी तपास करत गुरुवारी आरोपी वकिलास अटक केली. त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता ६ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुढील तपास पठाण करत आहेत.

Web Title: lawyer arrested for rape on lady