रडणाऱ्या चेहऱ्यांवर फुलतेय हास्य...
By Admin | Updated: August 5, 2016 19:25 IST2016-08-05T19:25:59+5:302016-08-05T19:25:59+5:30
‘देवा अजब तुझा कारोबार, तूच मोडीतो संसार आमुचा आणि तूच देतो आधार...’ या उक्तीचा अनुभव सध्या पाचोराबारी, ता.नंदुरबार येथील नागरिक घेत असून अवघ्या २० दिवसात हे गाव पुन्हा नव्याने उभे

रडणाऱ्या चेहऱ्यांवर फुलतेय हास्य...
- रमाकांत पाटील,
नंदुरबार, दि. ५ : ‘देवा अजब तुझा कारोबार, तूच मोडीतो संसार आमुचा आणि तूच देतो आधार...’ या उक्तीचा अनुभव सध्या पाचोराबारी, ता.नंदुरबार येथील नागरिक घेत असून अवघ्या २० दिवसात हे गाव पुन्हा नव्याने उभे राहत आहे. जिल्हाधिकारी आणि ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराचे अथक परिश्रम शिवाय त्याला मिळालेली जिल्हाभरातील स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य यामुळे येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर निश्चितच हास्य फुलत आहे.
पाचोराबारी येथे गेल्या १० जुलैच्या मध्यरात्री जल प्रलय आला आणि त्यातून गावाचे होते नव्हते झाले. जवळपास दोनशे कुटूंबांचा संसार पुर्णपणे वाहून गेला. १३९ घरांची पडझड झाली. ३२ घरे पुर्णपणे वाहून गेली. पावणेदोनशे पेक्षा अधीक जनावरे मृत झाली आणि सहा जणांचा बळीही गेला. जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी तर अक्षरश: गावाला उभे करण्यासाठी रात्रीचे दिवस केले. स्वत: चिखल, पाण्यातून फिरून प्रत्येक आपत्तीग्रस्त कुटूंबांना दिलासा देत राहिले. त्यांचे हे कृत्य पाहून जिल्ह्यातील अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. यातूनच प्रशासनालाही बळ मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या गावाला उभे करण्याचा निर्णय घेतला.
आज २० दिवसानंतर या गावाचा चेहरा बदलतांना दिसतोय. ११ ते १५ जुलै दरम्यान ज्या वसाहतीतील लोकांच्या चेहऱ्यावर भिती आणि अश्रू होते ते चेहरे आता काहीसे हासरे झाले आहेत, नव्हेतर त्यांच्या चेहऱ्यावर एक नवा आत्मविश्वास दिसू लागला आहे. या गावात प्रवेश केल्यानंतर शेकडो हात पुनर्रनिर्माणासाठी लागल्याचे दिसून येते. आपले मोडकळीस आलेले घर पुन्हा उभारण्यासाठी लोक परिश्रम घेत आहेत. त्याला जोड मिळतेय ती प्रशासन आणि आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराची. ज्यांची घरे ५० टक्केपेक्षा अधीक पडझड झाली होती ते घरे पुन्हा तेथेच नव्याने उभे राहत आहेत.
सध्या जवळपास ४० घरांचे पुनर्रनिर्माणाचे काम पुर्णत्वास आले आहे. ज्या घरांचा भिंती वाहून गेल्या होत्या त्या घरांना नवीन भिंती बनवून आणि जमिनीवर सिमेंटचा कोबा करून देण्यात येत आहे. विविध संस्थांनी जवळपास दीड हजारपेक्षा अधीक सिमेंटच्या गोण्या व एक लाखापेक्षा अधीक विटांची मदत दिली आहे. त्याचा वापर करून आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे स्वतंत्र गवंडी व मजूर लावून ही घरे बांधून देण्यात येत आहे.