शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

काँग्रेसचा बुरूज उभारणार, की पुन्हा एकदा कमळच फुलणार?; लातूरात चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 10:33 IST

काँग्रेसचे स्थानिक मुद्दे, तर भाजप मोदी गॅरंटीवर

हणमंत गायकवाड

लातूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा बुरुज उभारणार की पुन्हा एकदा कमळ फुलणार, यासाठी चुरशीची लढत आहे. भाजपचे सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात हा सामना रंगत आहे.

लातूर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक २००९ मध्ये झाली. ७ हजार ९७५ मताधिक्याने काँग्रेसने ही निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये मोदी लाटेत भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले. २०१४ आणि २०१९ या  दोन्ही निवडणुका एकतर्फी जिंकल्या. पण सध्याची निवडणूक भाजपला सोपी नाही. डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने काँग्रेसने कडवे आव्हान उभे केले आहे. तर भाजप वर्चस्व कायम ठेवण्यासाठी मोदी गॅरंटीचा नारा देत आहे. गेल्या दहा वर्षातील विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. भाजपकडून ही निवडणूक मोदी गॅरंटीवर तर काँग्रेसकडून सुसंस्कृत नेतृत्वाच्या नावावर लढविली जात आहे. 

आमदारांमध्ये स्पर्धामहाविकास आघाडीकडे लातूर लोकसभा मतदारसंघात तीन आमदार आहेत. मदतीला अनुभवी नेतृत्व आहे. डॉ. शिवाजी काळगे यांची भिस्त माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्यावर आहे. लोहा-कंधारचे आ. श्यामसुंदर शिंदे यांचेही पाठबळ आहे. काँग्रेस, उद्धवसेना आणि शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सोबत आहेत. महायुतीकडून खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील आदी अनुभवी नेते खिंड लढवत आहेत. मतदारसंघात भाजपची बुथ यंत्रणा मजबूत आहे. एकंदर, आमदारांमध्ये मताधिक्यासाठी रस्सीखेच आहे. तसेच वंचित फॅक्टर मागच्या वेळी जोरदार होता. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

रेल्वे कोच कारखाना, पीटलाईन, रस्ते आदी कामांचा दावा खा. शृंगारे करतात. तर विरोधक संसदेत कधी तोंड उघडले का, असा आरोप करतात. लातूरच्या पाण्याचा प्रश्न, रुग्णालयासाठी जागा, उद्योग, बेरोजगारी, शेतमालाला भाव, रस्त्याची दुरवस्था, कृषी, सिंचन, सौरउर्जा हे प्रश्न चर्चेत. काँग्रेसकडून भाजपा व काँग्रेस दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची तुलना केली जात आहे. कोणता उमेदवार सभागृहात आपली भूमिका मांडू शकतो, हे लातूरकरांनी ठरवावे, असे आवाहन केले जाते. 

गटातटाचा परिणाम नाही; मात्र थेट लढत भाजपमध्ये उघड गटबाजी नाही. परंतु, अंतर्गत हेवेदावे काहीवेळा कानावर येतात. मात्र लोकसभेच्या तयारीत सर्वांनाच एकत्र आणणारी यंत्रणा भाजपने राबविली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व एकहाती आहे. जिल्ह्याचे काँग्रेसमधील राजकारण त्यांच्या भोवती फिरत राहते. त्यामुळे लढत थेट होणार आहे.  

टॅग्स :latur-pcलातूरcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४