नगरला भक्तांकडून ट्रस्टींना लाथा, बुक्के

By Admin | Updated: July 12, 2017 04:45 IST2017-07-12T04:45:02+5:302017-07-12T04:45:02+5:30

दत्त मंदिरात चक्क ट्रस्टींनाच भक्तांनी एका खोलीत कोंडून लाथा, बुक्क्यांनी मारल्याची घटना गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली़

Latha, Bukke, to the Trustees by the devotees in the city | नगरला भक्तांकडून ट्रस्टींना लाथा, बुक्के

नगरला भक्तांकडून ट्रस्टींना लाथा, बुक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दत्त मंदिरात चक्क ट्रस्टींनाच भक्तांनी एका खोलीत कोंडून लाथा, बुक्क्यांनी मारल्याची घटना गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली़ तोफखाना पोलीस ठाण्यात मुंबईतील १५ भाविक आणि अन्य २५ ते ३० जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नितीन श्रीनिवास जोगळेकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ दत्त देवस्थाचे विश्वस्त नितीन जोगळेकर व राजन जोशी (रा़ सदाशिव पेठ, पुणे) यांचा विश्वस्तपदावरून मुंबईच्या भाविकांशी वाद झाला़ मुंबईच्या भक्तांनी पुण्याच्या जोगळेकर व जोशी यांच्या राजीनाम्याची मागणी केली़ त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला़ त्यानंतर चर्चेसाठी एका खोलीत जोगळेकर व जोशी गेले असताना तेथे मुंबईच्या भाविकांनी त्यांना कोंडून लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील
ऐवज घेतला, असे फिर्यादीत म्हटले आहे़
जोगळेकर यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी परदेशी (रा. पुणे) व काजरोळकर (रा. मुंबई) यांच्यासह मुंबई येथील १५ आणि आणखी काही २५ ते ३० महिला-पुरुषांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Latha, Bukke, to the Trustees by the devotees in the city