लता मंगेशकर करणार ‘चॅम्पियन्स’ पुस्तकाचे प्रकाशन
By Admin | Updated: July 4, 2014 09:13 IST2014-07-04T04:45:34+5:302014-07-04T09:13:35+5:30
मोहन बने लिखित ‘चॅम्पियन्स’ या भारतीय क्रिकेट संघाच्या संस्मरणीय विश्वचषक विजयावरील पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.

लता मंगेशकर करणार ‘चॅम्पियन्स’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : मोहन बने लिखित ‘चॅम्पियन्स’ या भारतीय क्रिकेट संघाच्या संस्मरणीय विश्वचषक विजयावरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, ४ जुलै रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.
मोहन बने यांनी या पुस्तकाद्वारे भारताच्या २०११ साली जिंकलेल्या विश्वचषकाच्या ऐतिहासिक विषयावर न लिहिता स्पर्धेचे आयोजन, नियोजन, सुरक्षा संघटक, मार्गदर्शन आदी विभागांत ज्यांचे भरीव योगदान लाभले अशा मान्यवर, विविध खेळातील दिग्गज खेळाडूंचे मत क्रिकेटप्रेमींसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर, आॅलिम्पियन माजी
हॉकीपटू धनराज पिल्ले, दिग्गज नेमबाज अंजली भागवत, माजी कसोटीपटू प्रवीण आमरे, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर व बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल यांचीदेखील विशेष उपस्थिती राहणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)