'INS विराट' निघाली शेवटच्या प्रवासाला
By Admin | Updated: July 23, 2016 16:57 IST2016-07-23T16:57:51+5:302016-07-23T16:57:51+5:30
आयएनएस विराट ही भारताची विमानवाहू युद्धनौका शनिवारी तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली

'INS विराट' निघाली शेवटच्या प्रवासाला
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 23 - आयएनएस विराट ही भारताची विमानवाहू युद्धनौका शनिवारी तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली. कोच्ची येथे आयएनएस विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि जलद गस्ती नौकांनी यावेळी विराटला सोबत केली.
विराट नौदलाच्या सुमारे 30 वर्षाच्या सेवेतून निवृत्त होणार आहे. याआधीच आयएनएस विराटवरील वैशिष्ट्यपूर्ण अशा "सी हैरियर " या लढाऊ विमानांना निरोप देण्यात आला आहे. सुमारे 28,000 टन वजनाच्या या युद्धनौकेची बांधणीला इंग्लंडमध्ये 1944 मध्ये सुरुवात झाली, मात्र लगेच महायुद्ध संपल्याने प्रत्यक्षात इंग्लंडच्या नौदलाच्या सेवेत 1959 ला HMS Hermes या नावाने दाखल झाली.
फॉकलॅड बेटांच्या युद्धात अर्जेंटीनाचा पराभव करण्यात या युद्धनौकेने महत्त्वाची कामगिरी बजावली. इंग्लंडच्या सेवेतुन ही विमानवाहू युद्धनौका 1984 ला निवृत्त झाली. भारतीय नौदलाने ती 1984 ला विकत घेतली आणि नुतनीकरण करत 1987च्या सूमारास सेवेत दाखल झाली. विराटचा हा स्वतःचा शेवटचा प्रवास असेल. कोच्ची येथे दुरुस्तीनंतर विराट 'टो' करुन मुंबईत आणली जाणार आहे.