पोषण आहारातील खिचडीत आढळल्या अळ्या
By Admin | Updated: September 28, 2016 21:24 IST2016-09-28T21:24:39+5:302016-09-28T21:24:39+5:30
अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील खिचडीत अळ्या आढळून आल्याची घटना गोंडखेल (ता. जामनेर) येथे बुधवारी सकाळी घडली.

पोषण आहारातील खिचडीत आढळल्या अळ्या
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 28 - अंगणवाडीत देण्यात येणाऱ्या पोषण आहारातील खिचडीत अळ्या आढळून आल्याची घटना गोंडखेल (ता. जामनेर) येथे बुधवारी सकाळी घडली.
नम्रता मनोज राजपूत या बालिकेला खिचडीत मेलेल्या अळ्या दिसून आल्या. संतप्त गावकऱ्यांनी या खिचडीचा नमुना घेऊन थेट पंचायत समिती कार्यालय गाठले व गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्यासमोर ठेवले. त्यांनी दोन दिवसात चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.