शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत लालपरी टॉप गिअरवर... हंगामी भाडेवाढ पडणार पथ्थ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 08:41 IST

एकूण उत्पन्न हे ४५० कोटींहून अधिक असेल. भाडेवाढीमुळे  एसटीच्या उत्पन्नात ४५ कोटींची भर पडेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे. 

मुंबई : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट चालणार आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना यामुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटीची १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली आहे. एकूण उत्पन्न हे ४५० कोटींहून अधिक असेल. भाडेवाढीमुळे  एसटीच्या उत्पन्नात ४५ कोटींची भर पडेल, अशी अपेक्षा एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे. 

दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण आपापल्या घरी किंवा आजोळी जात असतात. प्रवाशांची संख्या वाढणार हे गृहीत धरून एसटी महामंडळाने काही दिवस अगोदरच अचूक नियोजन केले आहे. दरवर्षी दिवाळी सुट्या लागल्या की अनेक जण आपापल्या गावी जातात. त्यामुळे दिवाळी सणापूर्वी व दिवाळी सण संपताना प्रवाशांची गर्दी होते. मात्र, एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फायदा खासगी वाहतूकदार घेत असतात.

ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीस धरत खासगी वाहतूकदार भाडेवाढ करतात. पण, प्रवाशांनी यंदा एसटीच्या महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि ज्येष्ठ नागरिक अमृत योजना यामुळे खासगी वाहतूकदारांना अल्प प्रतिसाद मिळणार असे चित्र आहे.

दिवाळी हंगामी भाडेवाढीसह एकूण उत्पन्न २०१७-१६ : २५६ कोटी ५५ लाख २०१८-२० : ३४२ कोटी २२ लाख २०१९-१२ : २५५ कोटी २४  लाख २०२२-११ : २१८ कोटी ३३ लाख

यंदा एसटीकडून महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, अमृतमहोत्सवी ज्येष्ठ यांना प्रवासात सवलत दिल्यानंतर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. विशेषतः महिला प्रवाशांचे प्रमाण जास्त आहे. यंदा एसटीने केलेल्या दहा टक्के भाडेवाढीमुळे एसटीच्या नियमित उत्पन्नात  ४५ ते ५० कोटींची भर पडेल.- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

टॅग्स :state transportएसटी