लकडावाला यांची कामगिरी सर्वोत्तम - शायना एन.सी.
By Admin | Updated: April 30, 2017 03:13 IST2017-04-30T03:13:53+5:302017-04-30T03:13:53+5:30
भाजपाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी शनिवारी सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या इमान अहमदची भेट घेतली. या वेळी डॉ. मुफ्फझल लकडावाला आणि

लकडावाला यांची कामगिरी सर्वोत्तम - शायना एन.सी.
मुंबई : भाजपाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी शनिवारी सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या इमान अहमदची भेट घेतली. या वेळी डॉ. मुफ्फझल लकडावाला आणि त्यांच्या चमूने केलेली कामगिरी ही सर्वोत्तम असल्याची पावती शायना यांनी दिली. शिवाय, वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या भेटीविषयी शायना यांनी टिष्ट्वट केले असून डॉ. लकडावाला यांच्या पाठीशी असल्याचेही जाहीर केले. टिष्ट्वटरवर त्यांनी ‘फाइट फॉर रिस्पेक्ट’ हा हॅशटॅगही पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इमानच्या घटलेल्या वजनाचा आलेख दर्शविणारा फोटोही पोस्ट केला आहे. यात तिची सप्टेंबर २०१६ ते एप्रिल २०१७ पर्यंतची माहिती आहे.
इमानच्या उपचारांविषयी उद्भवलेल्या वाद-प्रतिवादादरम्यान इमानची बहीण शायमाने इजिप्त आणि भारतातील डॉक्टरांवर विश्वास राहिला नसल्याची भूमिका मांडली होती. याच पार्श्वभूमीवर या वादावर पडदा टाकण्यासाठी शायना एन.सी. यांनी सैफी रुग्णालयात इमानची भेट घेतली. (प्रतिनिधी)