शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 06:42 IST

फडणवीस यांनी शरद पवारांना विचारला अवघड प्रश्न...!महाराष्ट्राला दिले रिपोर्ट कार्ड; विकासावरच जिंकण्याचा विश्वास

मुंबई : लाडकी बहीण योजना गेमचेंजर बनली आहे. आता विरोधक म्हणताहेत की, आमचे सरकार आले तर महायुतीने सुरू केलेल्या सर्व योजना बंद करू. पण, लाडकी बहीण योजनेसह आम्ही घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांना हात लावाल तर तुमचाच कार्यक्रम होईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विरोधकांना दिला.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त पत्र परिषद येथे झाली. यावेळी शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे सांगावे, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. तिन्ही नेत्यांनी यावेळी महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांची यादी पत्रकारांना दिली. आम्ही केलेली विकासकामेच महायुतीला पुन्हा सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाहीत. ते ‘सीएम-सीएम’ करत आहेत तर आम्ही ‘काम-काम’ करत आहोत. राज्यातील जनतेला ‘कॉमन मॅन’ न ठेवता त्याला आम्हाला ‘सुपरमॅन’ करायचे आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. 

‘जरांगे-पाटील यांनी समजून घ्यावे’- मराठा समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. आम्ही काय केले ते मनोज जरांगे -पाटील यांनी नीट समजून घ्यावे आणि जे आज बोलतात, त्यांनी मराठा समाजासाठी काय केले तेही समजून घ्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. देणारे कोण, फसविणारे कोण याचा विचार जरांगे-पाटील यांनी करावा, असेही ते म्हणाले.- ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, हा शब्द मी दिला होता. १० टक्के आरक्षण आम्ही दिले. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे मिळत नव्हती, ती मिळायला लागली, असेही ते म्हणाले.

‘लाडकी बहीण’ची रक्कम वाढविणारलाडकी बहीण योजना ही तात्पुरती नाही. त्यासाठी ४५ हजार कोटींची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात ही रक्कम वाढविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याचा विचार करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

जागावाटप अंतिम टप्प्यात महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, या प्रश्नावर मुख्यमंत्री स्वत: इथे बसले आहेत. शरद पवारांना माझे आव्हान आहे की, त्यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जागावाटप आता अगदी अंतिम टप्प्यात आले आहे ते लवकरच जाहीर करण्यात येईल.महाराष्ट्रात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के गुंतवणूक येते आणि तरीही गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याचा आरोप करतात. खरे तर महाविकास आघाडी हीच गुजरातची ब्रँड ॲम्बेसिडर आहे का, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.  

टॅग्स :MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार