शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

लाडक्या बहिणींचा भार 'आरोग्य' योजनांवर, जिल्ह्यानिहाय थकीत रक्कम.. जाणून घ्या  

By पोपट केशव पवार | Updated: April 7, 2025 12:20 IST

माहिती अधिकारात उघड 

पोपट पवारकोल्हापूर : सर्वसामान्य रुग्ण आजारी पडला तर त्याला शासकीय योजनांमधून चांगल्या प्रकारचे मोफत उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना सुरू केली खरी; मात्र या योजनेशी संलग्नित रुग्णालयांची एका वर्षात २५७ कोटी रुपयांची बिले थकल्याने या योजनांचा पांगुळगाडा झाल्याचे चित्र राज्यभरात आहे. सरकार पैसेच देत नसल्याने काही रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत लाभ देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. कोल्हापुरातील आरटीआय कार्यकर्ते सुनील मोदी यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली होती. त्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली.गरिबांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना व पंतप्रधान आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनांशी संलग्नित रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या उपचारांचे प्रतिपूर्ती रक्कम सरकारकडून संबंधित रुग्णालयांना दिली जाते. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिलेल्या रुग्णालयांची २२० कोटी २४ लाख ६५ हजार ६५५ रुपये इतकी रक्कम थकीत आहे.हे पैसे मंजूर झाले असले तरी अद्याप ते रुग्णालयांना दिलेले नाहीत. तर पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या रुग्णालयांची ३७ कोटी २९ लाख ९० हजार ६५० रुपये इतकी रक्कम थकली आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजनेची २२० काेटी रुपयांची बिले मंजूर आहेत. मात्र, यातील एक पैही रुग्णालयांना मिळालेला नाही.

जर रुग्णालयांची अशी बिले थकीत राहिली तर या योजनांशी संलग्नित रुग्णालये या योजनेअंतर्गत रुग्णांना उपचार करण्यास नकार देतील. परिणामी, सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे कठीण होणार आहे. - सुनील मोदी, माहिती अधिकार कार्यकर्ते, कोल्हापूर.

राज्यातील थकीत रक्कम अशी

जिल्हा   महात्मा फुले जनआरोग्य   पंतप्रधान आयुष्मान
अहिल्यानगर   ७६७१४००   १५९४२००
अकोला १९०६७६००   ३०१८२००
अमरावती ६९२७३२३५   १११७२८००
बीड   ३२२२०४००   ८२५३७००
भंडारा  ५३८६१००  १९९५४००
बुलढाणा   १२२१८२००   ३०१३३००
चंद्रपूर २६८३३७००   ८२७२३००
छ.संभाजीनगर १००६९७९१५    २१९४१७००
धाराशिव   १४१८९२००    ४३५४३००
धुळे    १३९८६६००    ८६८४७००
गडचिरोली   ३९८७३००    १४१४२००
गोंदिया  १७९१२६००    ६३८४२००
हिंगोली    १११०२००     ४२५२००
जळगाव  ३१६१७५००   ४०४०३००
जालना  २११००००    ७१९९००
कोल्हापूर  ४८३४८१५०   ११४१९९००
लातूर   २५३५४८००   ७६९४२००
मुंबई    ६२९१३६६४०    ७२०८६७००
मुंबई उपनगर   ३४८५४९००    २५८०६००
नागपूर   २३४९१९७४०    ७०२९८१५०
नांदेड     ४२८८०७००  ११४८७८००
नंदुरबार ३२६१७००   ५४६६००
नाशिक    ३१९०५९००    ७३७२३००
पालघर   ९७४३८००   १२९७३००
पंढरपूर    ३८३८३००  -
परभणी  १२७२२४००   २६९५४००
पुणे  २१७०३२८४०   २२३२६०००
रायगड   ९७३०७४३५    १३३२१७००
रत्नागिरी    ८३५११००    १७८५९००
सांगली  २९५९८२००   ४६५८२००
सातारा    ५९८१४०० ११०५६००
शिरपूर   २६०६२०००  -
सिंधुदुर्ग     १८८५६७००    ७२३६३००
सोलापूर   ५४३८९२०० ७५९०३००
ठाणे    २३७४१४३००    २१३४६८००
वर्धा     ५७२३१२००   १६४४८२००
वाशिम     ३०७१०००     ११५३०००
यवतमाळ११९२१३००     ३२५५३००
   
  

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारfundsनिधी