Ladki Bahin Yojana e-KYC: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खुशखभर आहे. मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. पूर्वी 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख ठरवण्यात आली होती, मात्र आता ही तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आदिती तटकरे म्हणाल्या, e-KYC प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती. 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या निर्देशानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक पात्र महिलांची e-KYC प्रक्रिया OTP समस्येमुळे पूर्ण होऊ शकली नव्हती. नवीन मुदत मिळाल्याने कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
e-KYC कशी करायची?
लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी संबंधित बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे. e-KYC करताना आधार क्रमांक नोंदवल्यानंतर आधार-लिंक मोबाइलवर OTP येतो. हा OTP टाकल्यानंतर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे OTP येत नाहीये आणि त्यामुळेच अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत होत्या. आता मुदतवाढ मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
Web Summary : Good news for women in Maharashtra! The e-KYC deadline for the Ladki Bahin Yojana has been extended to December 31, 2025, due to OTP issues. Minister Aditi Tatkare announced the extension, ensuring no beneficiary is left out.
Web Summary : महाराष्ट्र की महिलाओं के लिए खुशखबरी! ओटीपी समस्याओं के कारण लाडली बहिन योजना के लिए ई-केवाईसी की समय सीमा 31 दिसंबर, 2025 तक बढ़ा दी गई है। मंत्री अदिति तटकरे ने यह घोषणा की, जिससे यह सुनिश्चित होगा कि कोई भी लाभार्थी वंचित न रहे।