शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:46 IST

सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

आम्ही जी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे, ती कुणीही कितीही काहीही केले तरी बंद होणार नाही. ही योजना वाढतच जाईल आणि त्याचे पैसेही वाढत जातील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला दिला आहे. एवढेच नाही तर, आम्ही सुरू केलेल्या कुठल्याही योजना बंद पडणार नाहीत. सर्व योजना जनतेच्या आहेत. जे योजना बंद पाडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जनता कायमस्वरुपी घरी बसवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे -शिंदे म्हणाले, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याच वेळी त्यांनी (महाविकास आघाडी) खोडा घातला. ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली, हाकलवून लावले. यानंतर ते नागपूरच्या न्यायालयात गेले. काँग्रेसचे वडपल्लीवार गेले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे आणि पोटात खुपती आहे. त्यांनी सगळं सांगितलं आहे की, ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद पाडू, चौकशी करू. म्हणून त्यांना जनता साथ देणार नाही. त्यांचे सरकारच येणार नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. लाडक्या बहिणींनी ठरवले आहे की, या लाडक्या भावांना पुन्हा या सरकारमध्ये आणायचे आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे."

फेका-फेक करूनही धनुष्यबान त्यांच्यावर भारी पडला -"मशाल विरुद्ध धनुष्यबान हा लोकसभेत जिंकलेला आहे. लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेत एवढी सर्व फेका-फेक करून फेक नरेटिव्ह करूनही धनुष्यबान त्यांच्यावर भारी पडला आहे," असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

आपण मुख्य नेते म्हणून उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहात, या विधानसभेचा स्ट्राइकरेट कसा असेल असे वाटते? यावर बोलताना शिंदे म्हणाले, "मी सांगितले तुम्हाला की, स्ट्राइकरेट जो आहे, लोकसभेत एवढे सर्व फेक नेरेटिव्ह पसरवूनसुद्धा, लोकांना फसवूनही आमचा स्ट्राइकरेट उबाठा पेक्षा अधिक होता. तसेच महायुतीचा स्ट्राइकरेट जो आहे, तो या निवडणुकीत कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राइकरेट एकदम सर्वात भारी असेल आणि सर्वांना चारीमुंड्या चीत करेल. आमचे लोक या निवडणुकीत चौराक आणि षटकार मारतील.

    

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेनाladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा