शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

लाड यांना विधान परिषदेचा प्रसाद, माधव भंडारींना धक्का, काँग्रेसतर्फे दिलीप माने यांनी भरला अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 6:22 AM

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना

 विशेष प्रतिनिधी  मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे निष्ठावंत आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना डावलून राष्ट्रवादीतून पक्षात आलेले आणि अल्पावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती बनलेले प्रसाद लाड यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.७ डिसेंबरला होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार शेवटचा दिवस होता. भाजपाकडून मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची यावर रविवारी रात्रभर भाजपामध्ये खल झाला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पहाटेपर्यंत बैठकांचे सत्र सुरू होते. प्रसाद लाड यांनी रात्रीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवून बाजी मारल्याने अखेर लाड यांच्या गळ्यात उमेदवारी पडली. यापूर्वी मनसेतून आलेले प्रवीण दरेकर, काँग्रेसी नेत्यांशी जवळीक असलेले आर.एन. सिंह या नेत्यांना भाजपाने विधान परिषदेची संधी दिली आहे. लाड हेही राष्टÑवादीतून आलेले आहेत.लाड यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. असे असले तरी ‘प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अदृश्य ‘बाण’ (शिवसेना) चमत्कार करेल,’ असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लाड यांच्या विजयाबाबत शंका घेणारे पिल्लू सोडले आहे.अशी ठरली उमेदवारीभाजपाचा उमेदवार ठरविण्यासाठी चार दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माधव भंडारी, प्रसाद लाड यांच्यासह चार नावांवर चर्चा झाली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. दानवे आणि इतर काही नेत्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत लाड यांचे नाव निश्चित केले. लाड यांनी रात्रीच मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले.विजय निश्चितविधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या या एका जागेसाठी संख्याबळाचा विचार करता लाड यांचा विजय निश्चित आहे. भाजपाचे १२२ व शिवसेनेचे ६३ असे १८५ संख्याबळ लाड यांच्या पाठीशी आहे. अपक्ष व लहान पक्षांचे मिळून किमान १५ आमदार भाजपासोबत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१ असे एकूण ८३ संख्याबळ होते. लहान पक्षांपैकी काहींनी त्यांना पाठिंबा दिला तरी मतांची शंभरी गाठणेही अशक्य आहे...तर शिवसेनेची मते फुटली असती : राणेभाजपाने मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची मते फुटली असती आणि मी जिंकलो असतो, असा दावा महाराष्टÑ स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले, माझ्याविरोधात काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना एकत्र आले, यातच माझा विजय आहे.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र