बडनेरा: हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:20 IST2021-07-02T19:18:46+5:302021-07-02T19:20:16+5:30

बडनेरा मार्गावरील नवाथे चौकातील एका बड्या हॉटेलच्या पाचव्या माळ्यावर वेल्डिंगचे काम करताना कोसळून मजुराचा मृत्यू झाला.

laborer died after falling from the fifth floor of a hotel at badnera | बडनेरा: हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू

बडनेरा: हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू

अमरावती: बडनेरा मार्गावरील नवाथे चौकातील एका बड्या हॉटेलच्या पाचव्या माळ्यावर वेल्डिंगचे काम करताना कोसळून मजुराचा मृत्यू झाला. सुनील अमृतराव सोळंके (४७, रा. शारदानगर) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

त्या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर लोखंडी शेड बनविण्याचे काम सुरू आहे. तेथे अन्य चार पाच मजूर देखील होते. त्यावेळी सुनील सोळंके हा तेथे लोखंडी शिडीवर बसून वेल्डिंग करीत होता. त्याचवेळी त्याचे संतुलन बिघडल्याने तो जमिनीवर कोसळला. सहकारी मजुरांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा आप्त परिवार आहे. पाचव्या माळ्यावर शेड बनविण्याचे काम करताना संबंधित कंत्राटदाराने तेथे त्याअनुषंगाने कुठलीच सुरक्षा व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 

Web Title: laborer died after falling from the fifth floor of a hotel at badnera