शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती कारवाई करावी - आंबेडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:48 IST

कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारीनगर येथे दिला़

अहमदनगर - कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काही निवडक निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा करून नि:पक्षपातीपणे कारवाई करावी, अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी व संभाजी भिडे यांच्यातील संबंध उघड करू, असा इशारा भारिप महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारीनगर येथे दिला़पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करण्यापुरते हे प्रकरण मर्यादित नाही़ जी भिडेंची प्रवृत्ती आहे़, तीच प्रवृत्ती करणीसेनेची आहे़ संभाजी भिडे यांना पंतप्रधानच पाठिशी घालत आहेत, असा आपला सुरुवातीपासूनचा आरोप आहे़ या दोघांच्या संबंधाचे भक्कम पुरावे आपल्याकडे आहेत़, असे सांगून जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील़, असा इशाराही त्यांनी दिला.ते म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामीकडे सुरू आहे़राज्यातील अनियंत्रित हिंदू संघटना बेफाम झाल्या आहेत़ अनियंत्रित व नियंत्रित हिंदू संघटनांमध्ये भांडण सुरू झाले असून, त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू आहे़. या भांडणाची झळ मुस्लीम, ख्रिश्चन आणि दलितांना बसत नसून, मध्यमवर्गीय सवर्ण हिंदूंनाच बसत आहे़हिंदू संघटनांतील हे भांडण सवर्ण हिंदूंच्या दारात येऊन पोहोचले आहे़ वादाचे उत्तर कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही़ ते सवर्ण हिंदंूकडेच आहे़ त्यांनीच काय ते ठरावावे, असे आवाहन आंबेडकर यांनी या वेळी केले़शरद पवारांनी राजकीय चारित्र्य तपासावेराष्ट्रीय राजकारणात राजकीय चारित्र्यवान व्यक्ती एकत्र येत असतात़ समविचारी पक्षांना एकीची हाक देणाºयांनी स्वत:चे राजकीय चारित्र्य तपासण्याची गरज आहे़ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ही भाजपासोबत जाण्यास तयार नव्हती़ तेव्हा सर्वप्रथम राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला होता, ही बाब विसरून चालणार नाही़ संविधान बचाव रॅलीसाठीपवार यांच्यासोबत जाणार का, या पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पवार यांचे नाव न घेता, प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली़

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBhima-koregaonभीमा-कोरेगाव