शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा दंगल: पुरवणी दोषारोपपत्रातही भिडे, एकबोटेंना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:20 IST

फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी आठ जणांविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयात दुसरे पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. फादर स्टॅन स्वामी, प्रो. आनंद तेलतुंबडे, प्रो. हनी बाबू, गौतम नवलखा, मिलिंद तेलतुंबडे आणि कबीर कला मंचाचे कार्यकर्ते ज्योती जगताप, सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांच्या नावांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. मात्र, त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या नावाचा समावेश नाही. एकबोटे आणि भिडे गुरुजी या दोघांवरही गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.फादर स्टॅन स्वामी (८३) हे सामाजिक कार्यकर्ते असून, आदिवासी लोकांसाठी काम करतात. त्यांना गुरुवारीच एनआयएने रांचीहून अटक केली. शुक्रवारी त्यांना २३ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी अटक केलेल्या स्टॅन स्वामीविरुद्धही दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी एनआयएने पहिले दोषारोपपत्र नोव्हेंबर, २०१८ मध्ये विशेष न्यायालयात दाखल केले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढवळे, अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, डॉ. शोमा सेन, प्रा. रोना विल्सन आणि महेश राऊत यांच्या नावाचा समावेश होता.त्यानंतर, फेब्रुवारी, २०१९ मध्ये पहिले पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. कवी वरावरा राव, अ‍ॅड.सुधा भारद्वाज, सामाजिक कार्यकर्ते अरुण फेरारी आणि वेर्नोन गोन्साल्व्हिस यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र होते.फादर स्टॅन स्वामींना अटककोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी फादर स्टॅन स्वामी (वय ८३) या जेसुइट धर्मगुरूना गुरुवारी एनआयएने अटक केली. आदिवासींसाठी काम करणारे स्वामी हे बंदी घातलेल्या सीपीआय माओअिस्ट या संघटनेचे सदस्य आहेत, असा दावा एनआयएने केला आहे. - सविस्तर वृत्त/ देश-परदेश

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMilind Ekboteमिलिंद एकबोटे