शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा: गर्दीच्या नियोजनासाठी ड्रोन, सीसीटीव्हीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 01:46 IST

समाजमाध्यमांवर पोलिाांची राहणार नजर

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, वाहतूक, स्वच्छतागृह अशा सर्वांची चोख व्यवस्था केली आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली जाणार आहे. या काळात समाजकंटकांकडून अनुचित गोष्टींचा प्रसार केला जाऊ नये यासाठी पोलिसांकडून समाजमाध्यमांवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.कोरेगाव भीमा येथील अभिवादन दिनाला राज्यभरातून येणाºया नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक बोलावली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले या वेळी उपस्थित होते.तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवून त्यांच्यामध्ये सकारात्मक सक्षमता निर्माण करण्याची गरज आहे. डॉ. आंबेडकरांनी अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवनभर कार्य केले. त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही.देशाला सर्वोत्तम राज्यघटना देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. त्यांच्या विचार आणि वाणीमध्ये खूप मोठी ताकत होती. त्यांच्या विचारावर विश्वास असणारे अनुयायी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्या मुळे हा कार्यक्रम शांततेमधे पार पडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केला.पाणी, वाहनतळाचे नियोजनयेणाºया नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि शौचालयांची व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्याची सूचना, जिल्हाधिकाºयांनी केली. अन्न-पदार्थांच्या स्टॉलवर भेसळयुक्त पदार्थ नसतील, याची दक्षता घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, बॅरिकेट्स, वीजपुरवठा याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. तसेच, या ठिकाणी २५हून अधिक रुग्णवाहिकांची सोय करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती बैठकीत दिली. सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात, त्यामुळे अशा शक्तींपासून सर्वांनी सावध राहायला हवे. प्रत्येक नागरिक हा पोलीस असतो. नागरिकांना नकारात्मक बाबी आढळून आल्यास, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी या वेळी केले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस