कुरारमध्ये मित्राच्या मुलीवरच बलात्कार
By Admin | Updated: April 26, 2017 00:45 IST2017-04-26T00:45:07+5:302017-04-26T00:45:07+5:30
वडिलांच्या मृत्यूनंतर मदत मागण्यासाठी आलेल्या मित्राच्या मुलीवरच बलात्कार करण्याचा प्रकार मालाडमध्ये रविवारी उघड झाला.

कुरारमध्ये मित्राच्या मुलीवरच बलात्कार
मुंबई : वडिलांच्या मृत्यूनंतर मदत मागण्यासाठी आलेल्या मित्राच्या मुलीवरच बलात्कार करण्याचा प्रकार मालाडमध्ये रविवारी उघड झाला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
सीमा (नावात बदल) या तरुणीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. तिचे मालाड पूर्व परिसरतील घर तिच्या वडिलांनी एका इसमाला विकले होते. मात्र त्याच्या व्यवहारावरून या मुलीच्या कुटुंबीयांचे आणि त्या व्यक्तीमध्ये वाद सुरू होते. त्यासाठी तिने वडिलांचा मित्र जगन्नाथ पांडा (३७) याची मदत मागितली. मालाडच्या एका मूर्ती बनविण्याच्या कारखान्यात पांडा काम करतो. कामाच्या निमित्ताने सीमाचे पांडाला वरचेवर भेटणे व्हायचे. याचाच फायदा घेत पांडा आणि त्याचा सहकारी बाबू मंडल (४२) यांनी या मुलीवर बलात्कार केला. तसेच याची वाच्यता कुठेही न करण्याची धमकीदेखील दिली. मात्र गेल्या शुक्रवारी अचानक या मुलीला उलट्या होऊ लागल्या. तेव्हा तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने तिला तपासले तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे त्यांना समजले. त्यानुसार याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला डॉक्टरने दिला. तेव्हा या मुलीच्या आईने कुरार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)