शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कोपर्डी खटला : ती घटना आणि खटल्याचा घटनाक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:27 IST

 कोपर्डी (ता़ कर्जत जि़ अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणारी निर्भया सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजीचा मसाला आणण्यासाठी जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून गेली होती.

 कोपर्डी (ता़ कर्जत जि़ अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणारी निर्भया सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजीचा मसाला आणण्यासाठी जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून गेली होती़ ती परतत असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याने तिला अडविले़ निर्भयाला फरपटत रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात नेऊन तिच्यावर त्याने अत्याचार करून तिचा अमानूषपणे खून केला़ त्यानंतर मृतदेह घटनास्थळापासून जवळच असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली नेऊन टाकला़ याच दरम्यान निर्भयाचा मावस भाऊ तिला शोधण्यासाठी आला तेव्हा लिंबाच्या झाडाखाली त्याला शिंदे दिसला़ शिंदे याने तेथून पळ काढला़ काहीवेळातच घटनास्थळी मुलीचे नातेवाईक दाखल झाले तेव्हा तिचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह पडलेला होता़ तिच्या अंगावर सर्वत्र जखमा होत्या़ तिला तत्काळ कुळधरण येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले़ मात्र तोपर्यंत मृत्यू झालेला होता़ या घटनेबाबत कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली़ याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने कर्जत ठाण्यात फिर्याद दाखल केली़ घटनेच्या दुसºया दिवशी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले़ दोन दिवसांनंतर जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदा येथून पोलिसांनी अटक केली़ शिंदे याने केलेल्या कृत्यात (कटात) संतोष भवाळ व शिंदे याचा मावसभाऊ नितीन भैलुमे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले़ पोलिसांनी १६ जुलै २०१६ रोजी भवाळ तर १७ जुलै रोजी भैलुमे याला अटक केली़ या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केला़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी तपास करून घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी लढविला़आरोपी क्र. १जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदेशिंदे हा कोपर्डीतील रहिवासी असून, तो गावातीलच वीटभट्टीवर मजुरी करत होता़ त्याचे आई-वडीलही मोलमजुरी करतात़ घटनेनंतर आई-वडील गाव सोडून गेले आहेत़ पोलिसांना शिंदे याच्या घरात अश्लिल सीडी आढळल्या होत्या़ तो विवाहित आहे.आरोपी क्र. २संतोष गोरख भवाळभवाळ हा कर्जत तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी आहे़ तो जितेंद्र सोबत कोपर्डी येथे वीट्टभट्टीवर काम करत होता़ त्याचे आई-वडील मजूर आहेत़ तोही विवाहित आहे.आरोपी क्र. ३नितीन गोपीनाथ भैलुमेभैलुमे हा कोपर्डी येथील राहणारा असून, तोपुणे येथे बी.एस्सी.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता़ तो जितेंद्र शिंदे याचा मावसभाऊ आहे़निकम यांनी केला २४ मुद्यांवर युक्तिवादघटनेपूर्वी आरोपींचे पीडित मुलीशी गैरवर्तनपीडित मुलीचा अनैसर्गिक मृत्यूपीडित कोपर्डी शिवारात सापडलीआरोपी घटनास्थळी हजर होतेआरोपी शिंदेला साक्षीदाराने पळताना पाहिलेघटनास्थळी शिंदेची चप्पल व माळ मिळालीघटनेनंतर तीनही आरोपी पसार होतेशिंदेने ११ जुलैला दुचाकी विकत घेतलीघटनेनंतर ती दुचाकी जळीत अवस्थेत मिळालीशिंदेचे रक्ताने भरलेले कपडे पोलिसांनी जप्त केलेपीडितेच्या अंगावरील दाताचे व्रण आरोपी शिंदे याचेच२१ जुलैला शिंदे याच्या घरातून अश्लिल सीडी जप्तछेडछाडीदरम्यान इतर दोन आरोपी शिंदे याच्यासोबत होते़भैलुमे व भवाळ यांचे वक्तव्य, ‘नंतर हिला कामच दाखवू’तिघांचा अत्याचार करण्याचा कट होताभैलुमे व भवाळने शिंदेच्या कृत्यासाठी पहारा दिलापीडितेच्या मनात दहशत निर्माण केली होतीघटनेच्या वेळी शिंदे याचा भैलुमेस ३० सेकंदाचा फोनकृत्यानंतर पळ काढण्यास गाडी सज्ज ठेवली होतीतिघांनी मिळून अत्याचाराचा कट रचला होताचुका माहित असून देखील त्या कशा नाकारल्याआरोपींनी विसंगत जबाब दिलेकुठलाही रहिवास गुन्हा नाही, पण घटनास्थळी असणे हा गुन्हायुक्तिवादाचे ध्वनीमुद्रणया खटल्यात सरकारी व आरोपी पक्षाने केलेल्या अंतिम युक्तिवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले़ न्यायालयातील सुनावणीचे ध्वनीमुद्रण झाले, असा हा आजवरचा पहिलाच खटला. युक्तिवाद काय केला? हे समजण्यासाठी ध्वनीमुद्रण संबंधित खटला चालविणाºया वकिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.कोपर्डी घटनाक्रम१३ जुलै २०१६ : सायंकाळीसाडेसात वाजेच्या सुमारास कोपर्डी (ता. कर्जत)येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून१४ जुलै आरोपीच्या अटकेसाठी कोपर्डी येथे ग्रामस्थांचे आंदोलन१५ जुलै : मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला श्रीगोंदा येथून अटक१६ जुलै : दुसरा आरोपी संतोष भवाळ याला अटक१७ जुलै : तिसरा आरोपी नितीन भैलुमे यालाही अटक१८ जुलै : घटनेतील दोघा आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला२० जुलै : कर्जत येथील मुलींनी रस्त्यावर उतरून केला घटनेचा निषेध२४ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपर्डी येथे भेट२३ सप्टेंबर : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरात ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा७ आॅक्टोबर : तिघा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल१ एप्रिल २०१७ : कोपर्डी खटल्यातील तिघा आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला२३ जून : खटल्यात बचाव पक्षाकडून मुख्यमंत्री व अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी२ जुलै : कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचे स्मारक बांधण्याचा निर्णय७ जुलै : अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली३ आॅगस्ट : अ‍ॅड़ निकम यांच्यासह सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी खंडपीठाने फेटाळली१७ आॅगस्ट : अ‍ॅड़ निकम यांच्यासह सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली४ सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोपर्डी घटनेबाबत केलेल्या निवेदनाची व्हिडिओ सीडी आरोपी पक्षाने न्यायालयात दाखवली.२६ आॅक्टोबर : सरकारी पक्षाकडून अंतिम युक्तिवादाला प्रारंभ२६ आॅक्टोबर : आरोपी पक्षामुळे कोपर्डीचा खटला लांबल्याचा अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांचा आरोप९ आॅक्टोबर : आरोपी पक्षाचा अंतिम युक्तिवाद समाप्त१८ नोव्हेंबर : खटल्यातील तिघा आरोपींवर खून, अत्याचार व कटकारस्थानाचा दोष सिद्ध२१ नोव्हेंबर : आरोपी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद.२२ नोव्हेंबर : सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद.२९ नोव्हेंबर : तिघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.घटनेचे राज्यभर सामाजिक पडसादऐतिहासिक मूक मोर्चांचा जन्मकोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात सकल मराठा मोर्चा व त्यानंतर विविध जातींच्या मोर्चांचा जन्म झाला. सर्वप्रथम औरंगाबाद येथे ९ आॅगस्ट २०१६ रोजी सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला़ त्यानंतर राज्यात मराठा मोर्चांची मालिकाच सुरू झाली. तीन महिन्यांत लाखोंचे ५८ मोर्चे निघाले़ ९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबईत राज्यस्तरीय मोर्चा निघाला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, या मागणीसह मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत आक्षेपया घटनेला जातीय रंगही प्राप्त झाला. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी सुरुवातीला झाली. दलित संघटनांकडून या मागणीस तीव्र आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर या कायद्यात आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी मराठा मोर्चादरम्यान झाली़ कालांतराने हा वाद शमला. मराठा मोर्चानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज्यशासनाने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद भरत या पदावर संभाजीराव म्हसे यांची नियुक्ती केली. मात्र, म्हसे यांचे निधन झाल्याने पद पुन्हा रिक्त झाले.नेत्यांच्या रांगाकोपर्डी घटनेनंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राम शिंदे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह माजी मंत्री, आमदार, खासदार व विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी कोपर्डी येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले़ कोपर्डी येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर व जोगेंद्र कवाडे यांच्या भेटीला मात्र विरोध झाला़ त्यामुळे ते कोपर्डीला जाऊ शकले नाहीत़विधानसभेसह संसदेत पडसादकोपर्डी घटनेचे राज्याच्या विधानसभेसह संसदेतही पडसाद उमटले. संसदेत महाराष्ट्रातील खासदारांनी महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता़ विधानसभेत तर विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आक्रमक झाले होते़ प्रश्न उत्तरांचा तास स्थगित करुन कोपर्डी घटनेवर चर्चेची मागणी झाली़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ निकम यांची नियुक्ती केल्याचे सांगत खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे निवेदन केले.तपास सामाजिक दबावातून झाल्याचा आरोपकोपर्डी घटनेनंतर निर्माण झालेल्या सामाजिक दबावातून पोलिसांनी तपास पूर्ण करत आरोपींविरोधात पुरावे गोळा केले़ सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार प्रत्यक्ष घटनेशी विसंगत आहेत़, असा दावा युक्तिवादारम्यान तिनही आरोपीच्या वकिलांनी केला

 

टॅग्स :kopardi caseकोपर्डी खटलाCourtन्यायालयCrimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र