शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेची ‘कार ऑन ट्रेन’ सेवा, आजपासून बुकिंग सुरु; कुठून कुठे धावणार, आरक्षण कालावधी.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:27 IST

रस्त्यावरुन वाहन चालवत जाण्याच्या कटकटीतून होणार सुटका

रत्नागिरी : कोकणरेल्वे मार्गावर प्रवाशांसाठी ‘कार ऑन ट्रेन’ अर्थात रो-रो सुविधा सुरु हाेत आहे. या सुविधेमुळे आता कार थेट रेल्वेनेकोकणात किंवा गोव्यात नेता येणार आहे. या बहुप्रतिक्षित सेवेसाठी आरक्षणाची प्रक्रिया येत्या २१ जुलै २०२५ पासून सुरू होणार आहे.कोलाड (महाराष्ट्र) येथून या सेवेला २३ ऑगस्ट २०२५ पासून तर वेरणा (गोवा) येथून २४ ऑगस्ट २०२५ पासून सुरुवात हाेणार आहे. गेली अनेक वर्षे मालाने भरलेले ट्रक रेल्वे वॅगनवरुन वाहून नेणारी रो-रो सेवा यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर खासगी चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे लांब पल्ल्यात कार चालवण्याच्या त्रासातून सुटका होईल.

काय आहे ‘कार ऑन ट्रेन’ सेवा?कोकण रेल्वे मार्गावर गेली अनेक वर्षे रो-रो मालवाहतूक सेवा सुरू आहे. यामध्ये मालवाहू ट्रक विशेष रेल्वे वॅगनवर ठेवून त्यांची वाहतूक केली जाते. याच सेवेचा विस्तार करत, कोकण रेल्वेने आता खासगी कारची वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे लांबच्या प्रवासात कार चालवण्याचा त्रास वाचणार आहे.

कुठून कुठे धावणार ‘कार ऑन ट्रेन’?ही सेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेरणा दरम्यान उपलब्ध असेल. त्यामुळे कोकण आणि गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचा गाडीत चालवित जाण्याचा त्रास वाचणार आहे.

आरक्षण कालावधी

  • २१ जुलै २०२५ पासून सुरू.
  • १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत बुकिंग करता येणार.
  • ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार

कार ऑन ट्रेन सेवाकार बुकिंगच्या रेल्वेच्या नियमानुसार रो रो सुविधेत ट्रेन ला जोडलेल्या एसएलआर किंवा तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्यामधून फक्त तिघांना प्रवास करण्याची अनुमती दिली जाणार आहे. कारबरोबर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ठरवलेले भाडे मोजावे लागणार आहे.