शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सांगलीत महापुरामुळे ७९५ जनावरे दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 05:05 IST

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. या तीन जिल्ह्यांत ७९५ जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत.सांगली व कोल्हापुरात पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून तब्बल ४० हजार ६७६ कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. पूर ओसरू लागल्याने मृत जनावरे सापडत आहेत. हा आकडा वाढण्याची भिती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली. त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दुधामुळेच शेतक-यांचे संसार उभे राहिले. दुभती जनावरे घरात नाही, असे एक घर येथे बघायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे.पोल्ट्रीचेही मोठे नुकसान झाले. आठ दिवसांत जिल्ह्यात १९,५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला आहे. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले आहे.सांगली नगर वाचनालयाचे कार्यवाह अतुल गिजरे म्हणाले की, वाचनालयातील अनमोल ग्रंथसंपदा नष्ट झाली आहे. व्यवहार मूळ पदावर यायला किमान तीन-चार महिने लागतील. भिजलेली पुस्तके बाहेर आणून टाकली आहेत.सर्व व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवातकोल्हापूर शहरासह पूरग्रस्त भागातील व्यवहार काही प्रमाणात सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणची एटीएम मशीन पूर परिस्थितीमुळे बाधीत झाली आहेत. त्यामुळे बँकांमध्ये शुक्रवारी दिवसभर रोकड काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तर शहरातील व्यापारी, दुकाने, कार्यालये आदींमध्ये स्वच्छता मोहीम तीव्र करण्यात आली आहे.विश्वजीत कदम यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटकडेगाव (जि.सांगली) : नुकसान भरपाईच्या दुप्पट रक्कम पूरग्रस्तांना द्यावी, १०० टक्के कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आदी १५ मागण्या प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.पंंचनाम्यांसाठी अन्य जिल्ह्यांतून तलाठीपूरग्रस्तांची संख्या पाहता पंचनाम्यासाठी इतर जिल्ह्यांतून तलाठी, अव्वल कारकून आणि अभियंते मागविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला आहे. रेल्वे वाहतूक शुक्रवारी सुरू झाली. जिल्हा परिषदेत असलेले जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा मूळ ठिकाणी कार्यरत झाले आहे.

टॅग्स :floodपूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगली