Kolhapur North By Election Result: "...तर हिमालयात जाईन बोललो होतो"; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी मारली पलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:19 PM2022-04-16T14:19:53+5:302022-04-16T17:40:43+5:30

विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचं चिंतन करण्यात येईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Kolhapur North By Election Results: BJP Chandrakant Patil Reaction on Jayashree Jadhav win | Kolhapur North By Election Result: "...तर हिमालयात जाईन बोललो होतो"; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी मारली पलटी

Kolhapur North By Election Result: "...तर हिमालयात जाईन बोललो होतो"; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी मारली पलटी

googlenewsNext

मुंबई – आम्ही विकासाच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक लढवली होती. हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. राजकीय आवश्यकता म्हणून आम्ही हिंदुत्व स्वीकारलं नाही. हिंदुत्व या शब्दात पुरोगामित्व आहे. विज्ञाननिष्ठ सुद्धा हिंदुत्ववादी आहेत. हिंदू शब्दात सर्वधर्म समभाव आहे. स्वत:च्या धर्माचं पालन करताना दुसऱ्या धर्माचा आदर करणं हिंदुत्व आहे अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

चंदक्रांत पाटील(BJP Chandrakant Patil) म्हणाले की, कोल्हापूर उत्तरमध्ये ३ पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली. भाजपाने एकट्याने ७७ हजार मते मिळवली. पराभवाची कारणं शोधण्यात येतील. विकासाचे मुद्दे मांडले, हिंदुत्वाबाबत लपवाछपवी केली नाही. आम्ही कुठे कमी पडलो याचं चिंतन करण्यात येईल. मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. आम्हाला कुठलाही पश्चाताप नाही. प्रत्येक पक्षाचं धोरण वेगळे असतो. भाजपाच्या १५ महिला आमदार आहेत. जयश्री जाधव या भाजपाच्या होत्या परंतु काँग्रेस सत्तेत असल्याने त्याठिकाणी जाऊ निवडणूक लढवली. आम्ही सत्तेत असतो तर आमच्याबाजूने लढल्या असत्या असं त्यांनी सांगितले.

तसेच मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं म्हटलं होतं. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही असं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जाते. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभं करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

महाविकास आघाडीनं उधळला विजयाचा गुलाल

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी १८ हजारांच्या मताधिक्यांने निवडणूक लढवली आहे. सरकार पाडण्याच्या तारखेपासून अनेक दावे भाजपाकडून केले जातात त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना कुणी गंभीरतेने घेत नाही. निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात जाण्याची भाषा केली होती त्याची आठवणच लोकं करून देतात, मी त्यावर भाष्य करणार नाही असं विधान पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. कोल्हापूरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली.

विजयी उमेदवार जयश्री जाधव काय म्हणाल्या?

चंद्रकांत जाधव यांनी विकासाचं जे स्वप्न पाहिलं होते. परंतु दुर्दैवाने नियतीने त्यांचं स्वप्न अर्धवट राहिले. पत्नी म्हणून त्यांचे स्वप्न पूर्ण करणे माझं कर्तव्य होते. आज कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. भाजपानं मोठे मन दाखवून पोटनिवडणूक टाळायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. कोल्हापूर पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिले. महालक्ष्मीची कृपा असल्याने महिला आमदार कोल्हापूरातून निवडून आली आहे. कोल्हापूरच्या जनतेला हा विजय समर्पित आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.

Web Title: Kolhapur North By Election Results: BJP Chandrakant Patil Reaction on Jayashree Jadhav win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.