शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election Result: दादा, हिमालयात जा! राष्ट्रवादीनं चंद्रकांत पाटलांसाठी हरिद्वारचं तिकीट काढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:42 IST

Kolhapur North By Election Result: चंद्रकांत पाटील यांच्यासाठी थ्री टायर एसीचं तिकीट बूक; पुढील प्रवासासाठी खेचर सेवा देणाऱ्यांशीही बोलणी

कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत. 

कोल्हापुरात विधानसभेचे १० मतदारसंघ आहेत. पण जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्याची परिस्थिती आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक लागल्यानं भाजपला संधी होती. मात्र काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या व्यूहनीतीपुढे भाजपचा निभाव लागला नाही.

कोल्हापुरात पोटनिवडणूक घ्या, त्या निवडणुकीत पराभव झाला, तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आता कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पराभवानंतर विरोधकांनी पाटलांना त्यांच्या विधानाची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर थेट पाटील यांच्यासाठी हरिद्वाराचं तिकीट काढलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजा राजापुरकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुंबई ते हरिद्वार थ्री टायर एसी तिकीट काढलं आहे. हरिद्वारपासून हिमालयपर्यंत खेचर सेवा मिळण्यासाठीही बोलणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पाटील यांना त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांच्यासाठी थ्री टायर एसीचं तिकीट काढल्याचं राजापुरकर म्हणाले.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस