शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election Result: सलग तीन फेऱ्यांमध्ये भाजपला अधिक मतं; काँग्रेसचं मताधिक्य घटलं; कोल्हापुरात चुरस वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 10:49 IST

Kolhapur North By Election Result: काँग्रेसची आघाडी कमी करण्यात भाजपला यश; उत्तर कोल्हापुरात महाविकास आघाडीला धक्का?

कोल्हापूर: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेणाऱ्या काँग्रेसचं मताधिक्य हळूहळू कमी होताना दिसत आहे. सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव साडे नऊ हजारपेक्षा अधिक मतांना आघाडीवर होत्या. आता त्यांचं मताधिक्य ८ हजारांवर आलं आहे. मतमोजणीच्या तीन फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवार सत्यजित कदम पुढे आहेत. आठव्या, नवव्या, फेरीत कदम यांना जाधवांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत.

आठव्या फेरीपासून कदम यांना जाधव यांच्यापेक्षा जास्त मतं मिळताना दिसत आहेत. सातव्या फेरीत जाधव यांना १२०० मतं अधिक होती. त्यांच्याकडे एकूण ९ हजार ६७६ मतांची आघाडी होती. आठव्या फेरीत कदम यांनी ही आघाडी ५२४ मतांनी कमी केली. नवव्या फेरीतही कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांचं मताधिक्य ९ हजारांच्या खाली आलं. दहाव्या फेरीत कदम यांना ३ हजार ७९४ मतं मिळाली, तर जाधव यांना २ हजार ८६८ मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांचं मताधिक्य ८ हजार ७३ वर आलं आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास उत्तर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का बसू शकतो.कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील ३५८ मतदान यंत्रांतील मतमोजणीचे केलेले नियोजन पाहता आज, शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आरोपप्रत्यारोपाने उडालेला धुरळा, भाजपाने शेवटच्या टप्प्यात आणलेला हिंदुत्वाचा मुद्दा, यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. या ठिकाणी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात आहे.मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्ष, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरात प्रतिनिधी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंडपही उभारण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरBJPभाजपाSatyajit Kadamसत्यजित कदमcongressकाँग्रेस