शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 15:40 IST

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे.

ठळक मुद्देसतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील घडामोडींना वेग

कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसने शनिवारी केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामधील घडामोडींना वेग आला आहे. तूर्त काही दिवसांसाठी सुरेश कुराडे किंवा गुलाबराव घोरपडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली जावी, असा मतप्रवाह होता.

प्रदेश काँग्रेसकडूनही त्यासंबंधी कुराडे यांना विचारणा झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने कायमस्वरूपी जिल्हाध्यक्षपद नेमण्याचा निर्णय अखेर पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरुन सतेज पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पत्र सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी जाहीर केले आहे.पी. एन. पाटील यांच्यानंतर बराच प्रतिष्ठेचा मुद्दा करून जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आवाडे यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी फक्त सात महिनेच या पदावर काम केले. साताऱ्याच्या जिल्हाध्यक्षाने महिन्यात राजीनामा दिला व भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसला आवाडे यांच्या राजीनाम्याचा हादरा बसला आहे.

पाठोपाठ रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनाही अंतर्गत वादामुळे डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी अ‍ॅड. विजय भोसले यांची नियुक्त करण्यात आली आहे.पी. एन. पाटील हे सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीला वेळ द्यायचा असल्याने त्यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपद घेण्याची तयारी नव्हती, त्यामुळे आता या पदासाठी सतेज पाटील यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय काँग्रेसकडे नव्हता.आमदार सतेज पाटील हे तरुण आहेत. त्यांच्याकडे स्वत:ची भक्कम यंत्रणा आहे. निवडणुकीत उमेदवारांना ते चांगली ताकद देऊ शकतात. शिवाय ते विधानसभा निवडणूकही लढवणार नसल्याने या कामासाठी वेळही देऊ शकतात. या सर्वांचा विचार होऊन त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्याचा निर्णय झाला आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर