शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Maharashtra Political Crisis: “भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 14:02 IST

Maharashtra Political Crisis: देशाच्या ५० व्या स्वातंत्र्यदिनी बाळासाहेबांनी ध्वजारोहण केले होते. ७५ व्या वर्षी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी झेंडावंदन केले. १०० व्या वर्षी आदित्य ठाकरे करतील, असे किशोरी पेडणेकरांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: एकीकडे संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Day 2022) साजरा केला जात आहे. मात्र, यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देशातील समस्यांवर बोट ठेवत केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच सडकून टीका केली आहे.  यातच आता शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एक मोठा दावा केला आहे. भारताच्या १००व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किशोरी पेडणेकर यांनी सदर वक्तव्य केले. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याआधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ५०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात ध्वजारोहण करण्यात आले होते. आता पुढे देशाचा १०० वा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करतील, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. 

घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधताय 

देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव करत असताना देशात अडचणीदेखील तेवढ्याच आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी संसदेत आणि विधीमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. घराणेशाहीबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, घराणेशाहीबाबत फक्त ठाकरेंवर निशाणा का साधत आहात, असा प्रश्न करत, भाजपमध्येही नेत्यांच्या मुलीला, मुलाला संधी मिळत असते, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, केवळ हर घर तिरंगा मोहीम न राबवता देशातील घरोघरी वाढलेली महागाई कमी कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे, असा टोला शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात काहींकडे महत्त्वाची, मोठी खाती होती. दादा भुसे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आम्ही सोपवली होती. पण, हे खाते वाटप पाहता त्यांना काय मिळाले हा प्रश्न सगळ्यांना पडला असल्याचे अहिर यांनी म्हटले. भाजपच्या विचारांच्या अजेंड्यावर हे सरकार काम करत असून चांगली खाती भाजपच्या आमदारांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळKishori Pednekarकिशोरी पेडणेकरAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना